Goa Heritage House
Goa Heritage HouseDainik Gomantak

Goa Heritage House: पर्यटकांसाठी खुषखबर! आता गोव्यातील हेरिटेज हाऊसमध्ये राहता येणार...

गोवा सरकार आणणार नवीन धोरण; पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची माहिती

Goa Heritage House: गोव्यातील अनेक पोर्तुगीज स्टाईलच्या घरांचे मोठे आकर्षण पर्यटकांना असते. त्यामुळे गोव्यात पर्टटनासाठी आल्यावर अशा घरांना भेटी देणे, हा कार्यक्रमदेखील पर्यटकांच्या अजेंड्यावर असतो. या घरात वास्तव्य करण्याचीही पर्यटकांची इच्छा असते. ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. गोव्यातील अशा हेरिटेज हाऊसबाबत राज्य सरकार नवीन धोरण आणणार आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गोव्याचा पर्यटन विभाग पुढील काही महिन्यांत नवीन हेरिटेज पॉलिसी आणणार आहे. या नव्या धोरणामुळे त्या घरांच्या मालकांना त्यांची मालमत्ता दुरुस्त करण्यासाठी आणि पर्यटकांच्या निवासस्थानात रूपांतरित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे मंत्री खंवटे यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Goa Heritage House
AAP ने गोवा विधानसभा निवडणुकीत 100 कोटी उधळले, दक्षिण ग्रुपच्या दारू लॉबीकडून घेतले पैसे, ED चा आरोप

काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती पण ती फोल ठरली. काही घटकांमुळे लोकांना त्या योजनेचा लाभ घेता आला नाही. पर्यटन विभाग हे अडथळे दूर करून नवीन धोरण आणेल,” असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

गेल्या एका वर्षात गोव्याला पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. गोव्यात अनेक इंडो-पोर्तुगीज शैलीची किंवा या दोन्ही संस्कृतींचे मिश्रण असलेली सुंदर घरे आहेत. या घरांच्या मालकांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. पर्यटकांना अशा घरांमध्ये राहायचे असते, असेही खंवटे म्हणाले आहेत.

हॉप ऑन-हॉप ऑफ बसेस सुरू होण्यासाठी सज्ज असताना, पर्यटन विभाग नवीन पर्यटन सेवांचा शोध घेण्यावर आणि सादर करण्याचा विचार करत आहे. कोणत्या नवीन सेवा सुरू केल्या जाऊ शकतात, याचा शोध समिती घेणार आहे.

Goa Heritage House
Vijai Sardesai: 'म्हादई'बाबतचे मौन हा गोव्यातील भाजप नेत्यांच्या दुटप्पी वृत्तीचा पुरावा

नवीन सेवांच्या टिकाऊपणासाठी त्यांची देखील तपासणी करणे आवश्यक आहे, अशी माहितीही खंवटे यांनी दिली.

पाच वर्षांपूर्वी, पर्यटन विभागाने जमीन आणि समुद्रावर चालणारी वाहनसेवा सुरू केली. एका सेवा पुरवठादाराची निवड केली होती. दोन बस खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र परिवहन विभागाची परवानगी नसल्याने ही सेवा सुरू करता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com