Atal Setu : अखेर अटल सेतू अंशत: सुरू; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

परीक्षेच्या कारणास्तव 2 एप्रिलपासून एकेरी वाहतूक
Goa Traffic | Atal Setu | CM Sawant
Goa Traffic | Atal Setu | CM SawantDainik Gomantak

Atal Setu : गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीला आणि प्रवाशांच्या संतापाला कारणीभूत ठरलेली पणजी-पर्वरी परिसरातील वाहतूक काहीशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून अटल सेतूवरील हे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले.

तसेच अटल सेतूवर 2 एप्रिलपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने अटल सेतूवर पूर्वी केलेले डांबरीकरण आणि रसायनाचा थर काढून टाकावा लागत असल्याने या कामाला विलंब होत आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव अटल सेतू वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक मांडवी नदीवरील अन्य दोन पुलांवरून वळवली आहे.

Goa Traffic | Atal Setu | CM Sawant
Census: 'या' हिंदू देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी आली समोर, पुरुषांपेक्षा...

अर्थात, वाढलेली वाहन संख्या मोठी असल्याने पर्वरी ते बांबोळी आणि पर्वरी ते पणजी या मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. पर्वरीहून पणजीत येण्यासाठी अर्धा - अर्धा तास लागत असल्याने लोकांच्या संतापाची सीमा संपली आहे. याचा फटका नागरिकांसह आमदार, मंत्र्यांनाही बसत आहे.

सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी, रुग्णवाहिका यांनाही याचा त्रास होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकाऱ्यांसोबत सुरू असलेल्या कामाची पाहणी करून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या दुरुस्ती कामामुळे सध्या हा पूल पूर्णत: वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र, शनिवारी संध्याकाळपर्यंत अटल सेतूचा मेरशी- फोंड्याकडील एक भाग वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मेरशी जंक्शन येथे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्वरीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून म्हापसा रस्त्याची एक बाजू येत्या पाच दिवसांत खुली केली जाईल. तर दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूची एक बाजू २ एप्रिलपासून खुली करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Traffic | Atal Setu | CM Sawant
Goa Corona Update: राज्यातील सक्रिय कोरोनारूग्णांची संख्या 200 च्या जवळ, जाणून घ्या नवीन रूग्णसंख्या

पणजीतील कामांचीही मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पणजी शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विभागांची 24 कामे सुरू आहेत. यात साबांखा, जलस्रोत, जी-सुडा, वीज आदी खात्यांचा समावेश आहे. यातच जी-20 बैठकीसाठी काही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

त्यामुळे रस्ते वाहतुकीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. याचा मोठा फटका वाहनधारकांना बसला असून या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. या कामांचीही आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

रसायनाचा थर काढणे आव्हान

अटल सेतूवरील कॉंक्रिटीकरण घट्ट होण्यासाठी या रस्त्यावर प्रभावी रसायनाचा थर वापरण्यात आला होता. तो थर काही ठिकाणी निकामी झाल्याने हे तंत्रज्ञान बदलून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानानुसार मेमरी लेअर नव्याने टाकण्यात येत आहे.

मात्र, हे काम वेळखाऊ असल्याने डागडुजीला विलंब होत आहे. देशात केवळ अशा प्रकारच्या दोनच मशीनरी असून राज्यातील काम याच मशीनच्या साहाय्याने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडी कळ सोसावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com