Karnataka Assembly Election 2023: विश्‍‍वजीत राणेंचा अस्खलित कानडीतून प्रचार; ‘उत्तर कन्‍नड’ची जबाबदारी

मुख्‍यमंत्री सावंत यांची कारवार येथे पदयात्रा
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री, आरोग्‍यमंत्री व राज्‍यातील काही प्रमुख भाजप नेत्‍यांवर प्रचाराची धुरा सोपविण्‍यात आली आहे.

आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना उत्तर कन्‍नड जिल्‍ह्याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. त्‍यांनी आज हल्याळ-जोयडा मतदारसंघात अस्खलित कानडी भाषेतून संबोधन केले; तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवार येथील भाजप उमेदवार रूपाली नाईक यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली.

Karnataka Assembly Election 2023
Goa ST Reservation: गोव्यात एसटी आरक्षणावरून तणाव; मडकईकर म्‍हणतात, बहिष्काराचा निर्णय नव्‍हताच!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्‍यासाठी प्रचारात सर्वच पक्ष व्यस्त आहेत. निवडणुकीच्‍या रणधुमाळीत गोव्यातील मंत्र्यांनीही हजेरी लावत तेथील भाजपसाठी जोमाने प्रचार सुरू केला आहे.

मंत्री विश्‍वजीत राणे यांनी हल्याळ-जोयडा मतदारसंघात कानडी भाषेतून ‘तरुणांच्‍या हाताला रोजगार मिळण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला विजयी करा’, असे आवाहन केले.

त्‍यांनी कानडी भाषेतून केलेले भाषण ऐकून उपस्‍थितही भारावले. दरम्‍यान, यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा यांनी कर्नाटकमधील खानापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार केला आहे; तर मुख्‍यमंत्रीही गेल्‍या महिन्‍यापासून विविध भागांत प्रचारात योगदान देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tulunadu History
Tillari Water Diversion
Karnataka Supreme Court Cases
7000 Students Tested Positive HIV
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com