तुनीषच्या दीडशतकामुळे करिमाबाद ‘भक्कम’

प्रीमियर लीग क्रिकेट: चौगुलेचे जीनो क्लबला तीनशे धावांचे लक्ष्य, मोहितचे सहा बळी
Tunish Savkar
Tunish SavkarDainik Gomantak

पणजी: मध्यफळीतील तुनीष सावकार (161) याच्या खणखणीत दीडशतकामुळे जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात करिमाबाद क्रिकेट क्लबने दुसऱ्या दिवसअखेर भक्कम स्थिती गाठली. सांगे येथील जीसीए मैदानावर त्यांनी मडगाव क्रिकेट क्लबविरुद्ध (एमसीसी) पहिल्या डावात 337 धावांनी आघाडी मिळविली.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर चौगुले स्पोर्टस क्लबने जीनो स्पोर्टस क्लबला विजयासाठी 300 धावांचे आव्हान दिले. जीनो क्लबचा फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याने दुसऱ्या डावात 50 धावांत 6 गडी बाद केले, त्यामुळे चौगुले क्लबची आघाडी जास्त वाढली नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा जीनो क्लबने 1 बाद 44 धावा केल्या होत्या. ते अजून 256 धावांनी मागे असून शुक्रवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

Tunish Savkar
'लेखकांप्रती गोव्यातील समाजाची उदासीनता मला उद्विग्न बनविते'

करिमाबाद क्लबने कालच्या 3 बाद 170 वरून पहिला डाव 9 बाद 466 धावांवर घोषित केला. नंतर दुसऱ्या डावात एमसीसी संघाने मंथन खुटकर (नाबाद 67) याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर 2 बाद 125 धावा केल्या. ते अजून 212 धावांनी पिछाडीवर आहेत. मंथन व दिगेश रायकर (30) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 89 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

तुनीषने एमसीसी संघाच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढविला. 161 धावांच्या खेळीत तो 193 चेंडूंना सामोरा गेला. त्याने 16 चौकार व सात षटकार लगावले. तुनीषने गुरुवारी दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. त्याने राजशेखर हरिकांत याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 99, तर सोहम पानवलकर याच्यासह सहाव्या विकेटसाठी 153 धावांची भागी केली. राजशेखरने 48 चेंडूंत आठ चौकार व चार षटकारांसह 65, तर सोहमने 107 चेंडूंत तीन चौकार व चार षटकारांसह 76 धावा केल्या.

Tunish Savkar
‘सिडबी’कडून एक हजार कोटी मिळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 226 व दुसरा डाव: 44.3 षटकांत सर्वबाद 188 (शुभम गजिनकर 38, राहुल मेहता 27, इझान शेख 21, शुभम देसाई 34, पियुष यादव २५, दर्शन मिसाळ 33, ऋत्विक नाईक 1-40, सावियो काल्को 1-25, मोहित रेडकर 6-50, अमूल्य पांड्रेकर 1-29) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 44.4 षटकांत सर्वबाद 115 (दर्शन मिसाळ 3-18, फेलिक्स आलेमाव 5-51) व दुसरा डाव: 17 षटकांत 1 बाद 44 (अमोघ देसाई 12, शिवम आमोणकर नाबाद 19, दर्शन मिसाळ 1-20).

एमसीसी, पहिला डाव: 129 व दुसरा डाव: 32 षटकांत 2 बाद 125 (वैभव गोवेकर १३, मंथन खुटकर नाबाद 67, दिगेश रायकर नाबाद 30, वेदांत नाईक 1-25, अझान थोटा 1-15) विरुद्ध करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव: 93.3 षटकांत 9 बाद 466 घोषित (तुनीष सावकार 161, दीपराज गावकर 46, राजशेखर हरिकांत 65, सोहम पानवलकर 76, दिगेश रायकर 2-37, वैभव गोवेकर 2-28).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com