'लेखकांप्रती गोव्यातील समाजाची उदासीनता मला उद्विग्न बनविते'

राज्यपाल: पुंडलिक नायक यांचा 70 व्या वाढदिनानिमित्त हृद्य सत्कार
पुंडलिक नायक
पुंडलिक नायकDainik Gomantak

माशेल: कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हा सर्व गोमंतकीय शांत, सुशेगाद होते. गोव्यातील लेखकांप्रती समाजाची उदासीनता मला उद्विग्न बनवते. मात्र, लेखक, विचारवंत यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. तीच आपली परंपरा आहे, अशी भूमिका राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी मांडली.

ज्येष्ठ लेखक पुंडलिक नायक यांचा 70 व्या वाढदिनानिमित्त गुरुवारी दि.21 रोजी हृद्य सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.

पुंडलिक नायक
कोंकणी भाषा इतर प्रांतांमध्येही पोहोचण्याची गरज : ज्येष्ठ साहित्यकार पुंडलिक नाईक

राज्यपाल पिल्लई म्हणाले, देशाला लेखक, विचारवंतांचा आदर करण्याची मोठी परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाही कोणतेच पद नसलेल्या महात्मा गांधी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण यांना शिष्टाचार बाजूला ठेवून भेटायला जात. हीच आपली परंपरा आणि संस्कृती आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

पुंडलिक नायक
अंजुना पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा अमली पदार्थ जप्त

‘श्रद्धा गरडसारख्या लेखिका अर्धांगवायूने गेली पाच वर्षे अंथरुणाला खिळलेल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांना कोणी भेट दिली नाही, की वैद्यकीय मदतही केली नाही. मी आर्थिक मदत केली. गोवा शिपयार्डला फोन केल्यावर त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. मात्र, त्या म्हणाल्या, मला पैसे नकोत. हा त्यांचा आत्मसन्मान आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला फोन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू

झाले. पंतप्रधान रिलीफ फंडसाठीही मी श्रद्धा गरड यांचे नाव सुचवले आहे. त्यांनी मोबाईलवर कविता टाईप एक पुस्तक लिहिले. त्यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कारही मिळाला. या समारंभामुळे पुंडलिक नायक यांनाही पुन्हा लेखन सुरू करण्याची ऊर्जा मिळेल’ असेही राज्यपाल म्हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com