गोव्याची हिरवाई नष्ट होतेय, त्याकडे लक्ष द्या! ३ विद्यार्थिनींनी अवैध बांधकामांविरुद्ध केले Reel; ‘इको थिंकर्स फेस्ट’ उपक्रम

Goa illegal construction reel: बेकायदेशीर बांधकामाविरोधातील प्रकरणे हाताळताना न्यायालयांनी पर्यावरण पूरक आणि कठोर भूमिका घ्यावी, असा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
 goa illegal construction reel
goa illegal construction reelDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पर्यावरणाचे रक्षण आणि आणि समाजाची त्याबद्दल असलेली संविधानिक जबाबदारी या संदर्भात जागृतीसाठी येथील कारे कायदा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इको थिंकर्स फेस्ट’मध्ये कारे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी केलेल्या गोव्यातील बेकायदेशीर बांधकामांवरील ‘रील’ने सर्वांचे लक्ष वेधले. या फेस्टचे गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

ही दीड मिनिटांची ‘रील’ गोव्यातील बेकायदेशीर बांधकामामुळे निसर्गाचा होणारा विद्ध्वंस यावर आधारित असून कारे कायदा महाविद्यालयाच्या ‘बीए एलएलबी’ अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या संचाली कुंकळयेकर, रिद्धी केरकर आणि विशाखा फळ देसाई या तीन विद्यार्थिनींनी प्रा. रुबी डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहे.

बेकायदेशीर बांधकामाविरोधातील प्रकरणे हाताळताना न्यायालयांनी पर्यावरण पूरक आणि कठोर भूमिका घ्यावी, असा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याची पार्श्वभूमी या सर्व उपक्रमामागे आहे. गोव्याची हिरवाई नष्ट होते याकडे लोकांनी आता लक्ष देण्याची गरज या ‘रील’मधून व्यक्त केली आहे.

 goa illegal construction reel
Camurlim Illegal Construction: 'ते' बांधकाम बेकायदाच! हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; कामुर्लीतील बांधकाम पाडण्याचे आदेश

या ‘रील’चे आज पांगम यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ‘ज्युरीज ओपन २०२५ -इको थिंकर्स फेस्ट’ असे या महोत्सवाचे नाव आहे. या महोत्सवात देशभरातील कायदा विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून उद्घाटन प्रसंगी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन कुंकळयेकर, उपाध्यक्ष प्रीतम मोरायस, प्रसाद नाईक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 goa illegal construction reel
Illegal Sand Extraction: अवैध वाळू उत्खनन प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; 7 जणांच्या आवळल्या मुसक्या

या सुंदर गोव्याकडे कमी प्रमाणात जमीन उपलब्ध असून या जमिनीवर जमीन भक्षकांची वक्रदृष्टी आहे. गोव्याची जमीन वाचवायची असेल तर पर्यावरण रक्षणासाठी जे कायदे तयार केले आहेत त्यांचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.

देविदास पांगम, ॲडव्होकेट जनरल गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com