

डिचोली: राज्य सरकारने सुधारीत ''कामधेनू'' योजना लागू करतानाच दूध दरवाढ जाहीर केल्यामुळे राज्यातील दूध व्यवसाय वृद्धींगत होऊन उत्पादनात वाढ होणार आहे, असा आशावाद डिचोलीतील दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधीं व्यक्त केला आहे.
गोवा डेअरीचा कारभार घालण्यासाठी ती काही काळ राष्ट्रीय दूध विकास मंडळाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी डिचोलीच्या अभिनव सहकारी दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष गुरूदास परब आणि कासारपाल दूध संस्थेचे अध्यक्ष निलेश मळीक यांच्यासह इतर दुध उत्पादकांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
या पत्रकार परिषदेवेळी अडवलपाल दूध सोसायटीची अध्यक्ष भागीरथी देसाई, मुळगावची देवर्षा परब आणि अरूप आरोंदेकर उपस्थित होते. सरकारने सुधारीत ''कामधेनू'' योजना लागू करताना गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदानात वाढ केली आहे.
तसेच गाय आणि म्हशीच्या प्रति लिटरमागे अनुक्रमे ६ आणि १० रुपये दरवाढ केली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे दूध उत्पादकांना मोठा दिलासा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता अनेकजण या व्यवसायात उतरणार असून, राज्यात निश्चितच धवलक्रांती होणार, असा विश्वास गुरूदास परब आणि निलेश मळीक यांनी व्यक्त केला.
...आधारभूत मूल्य
गेल्या काही वर्षांपासून दूध व्यवसाय करताना दूध उत्पादकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीने घेतलेल्या निर्णयांमुळे दूध व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार, असा विश्वास डिचोलीतील दूध उत्पादकांनी व्यक्त केला. सरकारमुळे दूध उत्पादकांना आता आधारभूत किमत वेळेवर मिळत आहे, असे भागीरथी देसाई यांनी सांगून सरकारला धन्यवाद दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.