Goa SSC HSC: 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; येत्या वर्षापासून एकच अंतिम परीक्षा

पुढील शैक्षणिक वर्षापासून (2023-24) 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे.
 SSC and HSC
SSC and HSC Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa SSC HSC Exam: गोव्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा उद्यापासून (बुधवार, दि.15) सुरू होणार आहे. राज्यभरातून या परीक्षेसाठी 9,932 विद्यार्थी आणि 9,875 विद्यार्थिंनी बसणार आहेत. यासाठी मंडळाकडून बैठकव्यवस्था देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच, येत्या 01 एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.

दरम्यान, येत्या वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून (2023-24) 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी आणि बारावीच्या दोन सत्र परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल देण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या या पद्धती बंद करून अंतिम परीक्षेतील गुणांवर निकालपत्र दिले जाणार आहे.

कोरोना काळात संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता पहिल्या लाटेत दुसरे सत्र होऊ शकले नाही. त्यामुळे पहिल्या सत्राच्या आधारावर निकाल देण्यात आला. तर, दुसऱ्या लाटेत पहिली आणि दुसरी सत्र परीक्षा यांचे गुण विचारात घेऊन निकाल देण्यात आला.

 SSC and HSC
Pernem Accident: रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रकची धडक, पेडणेतील युवक जागीच ठार

दरम्यान, सध्या कोरोनाची संसर्गाचा प्रभाव कमी झाला असल्याने शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून ही पद्धत बंद केली जाणार आहे. पण, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीचा निकाला दोन्ही सत्रांच्या आधारेच दिला जाणार आहे. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा

राज्यातील वीस केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. 15 ते 31 मार्च या कालावधीत परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा सकाळी 9.30 वा सुरूवात होणार आहे. शिवाय 20, 23 आणि 27 मार्च रोजी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 वा. सुरू होईल.

(कला शाखेचे 5,066, वाणिज्य शाखा 5,381, विज्ञान शाखा 5,381 व व्यावसायिक शाखा 3,281 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 97 Voters Electoral Roll
Gen Z Movement India
ICC ODI World Cup 2027
8th Pay Commission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com