गोव्यातील नामांकित कलाकाराच्या चित्राची चोरी! डॉलरमध्ये होतेय ऑनलाईन विक्री

Goa News: कालिदास यांनी जलरंगामध्ये (वॉटरकलर) रेखाटलेले ‘गणपती’चे चित्र समाजमाध्यमांतूनच चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे
Goa News: कालिदास यांनी जलरंगामध्ये (वॉटरकलर) रेखाटलेले ‘गणपती’चे चित्र समाजमाध्यमांतूनच चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे
Kalidas Satardekar Shri Ganesha Painting Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कालिदास सातार्डेकर हे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले गोव्यातील नामांकित चित्रकार आहेत. जलरंग हे त्यांच्या विशेष आवडीचे माध्यम आहे. जलरंगातून त्यांनी काढलेली चित्रे देशातील नामांकित कला गॅलरींमध्ये प्रदर्शित झालेली आहेत. अशा या नामांकित चित्रकाराच्या ‘गणपती‘ची चोरी झाली आहे. कालिदास यांनी जलरंगामध्ये (वॉटरकलर) रेखाटलेले ‘गणपती’चे चित्र समाजमाध्यमांतूनच चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या चित्राची कॉपी होऊन ते चित्र आज अवैधपणे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ते डॉलरमध्ये विकले जात आहे.

या प्रकारामुळे कालिदास सातार्डेकर यांना धक्का बसला असून, या प्रकाराविषयी त्यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, आपले मित्र तथा चित्रकार संदेश नाईक यांना आपण काढलेले ‘गणपती‘चे वॉटरकलर चित्र ऑनलाईन विक्री होत असल्याचे आढळले होते. ही बाब चार-साडेचार महिन्यांपूर्वीची. परंतु आपण ती बाब फार गंभीरपणे घेतली नाही, मात्र आपल्या चित्रासाठी डॉलरमधून आकारली जाणारी रक्कम पाहिल्यानंतर आपल्याला दुसरा धक्का बसला. अजूनही आपण सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केलेली नाही.

ज्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे या चित्राची विक्री होत आहे, त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ती व्यक्ती उत्तर भारतातील एका शहरात असल्याचे दिसून आले आहे. तिथून संबंधित व्यक्ती या चित्राची विक्री करीत असून, संकेतस्थळ परदेशातून हाताळले जात असावे, असे वाटते. लवकरच आपण सायबर क्राईमकडे याविषयी रितसर तक्रार करणार आहोत.

Goa News: कालिदास यांनी जलरंगामध्ये (वॉटरकलर) रेखाटलेले ‘गणपती’चे चित्र समाजमाध्यमांतूनच चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे
Goa Beach Wedding: गोव्यात समुद्रकिनारी लग्नसोहळ्याचा विचार करताय? सरकारने ‘तो’ निर्णय मागे घेतला, वाचा नवीन दर

कालिदास सातार्डेकर

आपण काढलेल्या मूळ चित्रावर आपली सही आहे. परंतु चित्राची कॉपी विकणाऱ्याने ती सही घालविली आहे. समाजमाध्यमांत छायाचित्र टाकताना त्यावर कॉपीराईटचे हक्क राखून असल्याचे काही नमूद करण्याचे आपल्याही लक्षात आले नाही. आता छायाचित्रांवरील वॉटरमार्कही घालविणारे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने सही घालवणे अजिबात अवघड राहिलेले नाही. परंतु अशाप्रकारे कलाकारांच्या कलेची जर चोरी होत असेल तर ते नक्कीच धक्कादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com