‘जंगलातून बाहेर पडा, अन्यथा कारवाई करू’, कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पासाठी 630 कुटुंबांचे स्थलांतर, केवळ 15 लाखांची भरपाई

Kali Tiger Project Karnataka: काळी व्याघ्र प्रकल्पासाठी गावांमधील कुटुंबांना प्रत्येकी केवळ १५ लाख रुपये देऊन स्थलांतर करणे आता सुरू झाले आहे. याकडे सत्तरीवासीयांची नजर लागून राहिली आहे.
Tiger Reserve Goa
Tiger Reserve GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पासाठी गावांमधील कुटुंबांना प्रत्येकी केवळ १५ लाख रुपये देऊन स्थलांतर करणे आता सुरू झाले आहे. याकडे सत्तरीवासीयांची नजर लागून राहिली आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प म्हणजे स्थलांतर, अशी खूणगाठ मारली जात आहे.

कर्नाटकातील जोयडा तालुक्यातील ६३० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे. स्थलांतरानंतर आता या कुटुंबांनी तक्रार करून स्थलांतरास विरोध दर्शविला आहे. स्थलांतर योजनेत १४८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप आहेच; शिवाय सरकारकडून केवळ १५ लाख रुपये देऊन बोळवण केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Tiger Reserve Goa
Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

प्रलोभनांना बधले नाहीत वननिवासी

व्याघ्र प्रकल्पासाठी आधी स्वेच्छा स्थलांतराचा प्रस्ताव वननिवासी कुटुंबांसमोर ठेवण्यात आला होता; परंतु त्या कुटुंबांनी हा प्रस्ताव नाकारला. १५ लाखांत पुनर्वसन अशक्य असल्याने आपण शेती, घर सोडून कोठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. नंतर वन खात्याने स्थानिकांना अनेक प्रलोभने दाखविली. पण नागरिक बधले नाहीत.

Tiger Reserve Goa
Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

स्थानिकांचा विरोध मोडून काढला

वन खात्याने ‘तोडा-फोडा आणि निर्णय लादा’, असा पवित्रा घेत ६३० कुटुंबांना स्थलांतरास राजी केले. त्यासाठी तुम्हाला सोयी-सुविधा मिळणार नाहीत. ‘जंगलातून बाहेर पडा, अन्यथा कारवाई करू’, अशी धमकीही देण्यात आली. ६३० कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फसविले गेल्याचे या कुटुंबीयांच्या लक्षात आले.

मी झर्मेसारख्या ग्रामीण भागात राहतो. गाव टिकण्यासाठी आपली जमीन आणि नैसर्गिक संपत्ती आपल्या हाती असणे अत्यावश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी प्रचंड कष्ट करून ही संपत्ती जपली, म्हणूनच ती आज आपल्याला वारसा म्हणून मिळाली आहे. पण जर सरकारने विनाकारण आमच्यावर व्याघ्र प्रकल्प लादला तर आम्ही जगायचे कसे?

दत्ता गावस, माजी सरपंच, झर्मे.

व्याघ्र क्षेत्र गरजेचे आहे. न सुटलेले जमीन हक्क, शेती आणि जंगलावर असलेला जीवन निर्वाहाचा आधार, यांमुळे आरक्षित क्षेत्राच्या सीमारेषा निश्चित करणे हे अत्यंत संवेदनशील प्रकरण ठरते. खासगी जमीन कोअर आणि बफर झोनमध्ये नको.

राजेश सावंत, कोपार्डे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com