KalaRang Festival 2024: जागर संगीत कलेचा! गोव्यात आजपासून कलारंग महोत्सवाची सुरुवात; ‘नारी शक्ती’ संकल्पना

KalaRang Festival 2024 In Goa: ‘कलारंग २०२४’ हा पाच दिवसीय महोत्सव आजपासून रवींद्र भवन सभागृहात सुरु होत आहे. ‘नारी शक्ती’ ही संकल्पना असलेल्या या महोत्सवात सर्वाधिक कार्यक्रम महिला कलाकार सादर करणार आहेत.
KalaRang  Festival 2024
KalaRang Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

मंगेश बोरकर

कलांगण संस्था, रवींद्र भवन मडगाव व कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला संगीत, नृत्य, नाट्यावर आधारित ‘कलारंग २०२४’ हा पाच दिवसीय महोत्सव आजपासून रवींद्र भवन सभागृहात सुरु होत आहे. ‘नारी शक्ती’ ही संकल्पना असलेल्या या महोत्सवात सर्वाधिक कार्यक्रम महिला कलाकार सादर करणार  आहेत. 

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री अलका कुबल आठल्ये ह्या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. कलाक्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या वर्षा उसगावकर, हेमा सरदेसाई व वालुस्चा डिसोझा यांचा या प्रसंगी सत्कार केला जाईल. गेली २५ वर्षे संस्थेशी दीर्घकाळ संलग्न असलेल्या व शास्त्रीय नृत्यामध्ये आपले बहुमोल योगदान देणाऱ्या डॉ. सुचिता भिडे चाफेकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

संध्याकाळी  ६.१५ वाजता होणाऱ्या उदघाटनानंतर  ७.४५ वाजता पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया व सुचीस्मिता या भगिनींचे बासरी वादन संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षण असेल.

‘बासरी बहिणी’ सुचीस्मिता आणि देबोप्रिया चटर्जी

भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगात या दोघांना ‘बासरी बहिणी’ म्हणून ओळखले जाते. या दोघी संगीततज्ज्ञ कृष्णा व रॉबीन चटर्जी यांच्या कन्या असून  पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून त्यांना शिक्षण प्राप्त झाले आहे. 

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये या दोघींनी आपली छाप पाडली असून त्यांना  अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काशीनाथ मिश्रा त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत.

KalaRang  Festival 2024
Cannes Film Festivel : अन् कॅप्टन जॅक स्पॅरोसाठी सगळे टाळ्या वाजवत उभे राहिले....कान्समध्ये जॉनी डेपला स्टँडिंग ओवेशन व्हिडीओ व्हायरल

1) उदघाटक अलका कुबल आठल्ये यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या सशक्त अभिनयाने ४० वर्षांची कारकीर्द गाजवली आहे. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्या घराघरात पोहोचल्या. 

2) सत्कारमूर्ती वर्षा उसगावकर या प्रसिद्ध रंगमंच, टीव्ही, मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील सशक्त अभिनेत्री आहेत. सध्या त्या काम करत असलेल्या  टीव्ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

3) हेमा सरदेसाई या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातनाम गायिका आहेत. ‘आवारा भंवरे’ या गाण्याने त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. 

4) वालुस्चा डिसोझा या अनेक टीव्ही शोची सूत्रधार आहेच शिवाय ती मॉडेल असून शाहरुख खान सोबत हिंदी चित्रपट ‘फॅन’ आणि वेब सिरीज ‘तनाव’ मध्ये तिने अभिनय साकारला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com