Kala Academy Slab Collapsed: कला अकादमीच्या 'स्लॅब'वरून आरोप-प्रत्यारोपांना धार; कोण काय म्हणाले? वाचा एका क्लिकवर...

मुख्यमंत्र्यांनीही केली पाहणी; चौकशीची दिली ग्वाही
Kala Academy Slab Collapsed:
Kala Academy Slab Collapsed:Dainik Gomantak
Published on
Updated on

Kala Academy Slab Collapsed: कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम 2021 पासून सुरू आहे. सोमवारी, 17 जुलै रोजी कला अकादमीच्या खुल्या सभागृहाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. या सभागृहाचे बांधकाम नवीनच असून यासाठी 55 कोटींहून अधिक पैसे खर्च करण्यात आले करण्यात आले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कोसळलेल्या स्लॅबची पाहणी केली. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे.

न्यायालयीन चौकशीची करा ः युरी आलेमाव

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, कला अकादमीचा स्लॅब कोसळणे हे सरकारच्या कामाचे अपयश आहे. हे दुय्यम दर्जाचे काम आहे, असे दिसते. या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे.

Kala Academy Slab Collapsed:
Sanjivani Sugar Factory: संजीवनी कारखान्यासाठी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; 200 हून अधिक आंदोलक शेतकरी ताब्यात

श्वेत पत्रिका प्रकाशित करू ः मंत्री काब्राल

सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल म्हणाले, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. या चौकशी समितीत आयआयटी मद्रास तसेच राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. तसे निर्देश अभियंत्याना दिले आहेत.

हा अहवाल मिळाला की, कला अकादमीच्या कामाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू. दरम्यान, ‘पीडब्ल्यूडी’चे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्यासोबत काब्राल यांनी कोसळलेल्या स्लॅबची पाहणी केली.

गावडे यांचे मंत्रीपद काढून घ्या ः आमदार विजय सरदेसाई

खरा ताजमहल अजून सुस्थितीत उभा आहे. कारण शाहजहानने 40 टक्के कमिशन घेऊन काम केले नव्हते. गोव्याच्या शाहजहानने केलेल्या भ्रष्टाचारामुळे गोवा उद्धवस्त होत चालला आहे. निकृष्ट कामामुळेच हा स्लॅब कोसळला. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्री गोविंद गावडे यांचा राजीनामा घ्यावा. अधिवेशनाह हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रश्नाबाबत बोलताना शाहजहानने ताजमहलचे काँट्रॅक्ट दिले नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून गेल्या काही काळात आमदार सरदेसाई हे कला अकादमीचा उल्लेख ताजमहल आणि मंत्री गावडे यांचा उल्लेख शाहजहान असा खोचकपणे करतात.

काँग्रेसची टीका

काँग्रेस प्रवक्ता तुलिओ डीसुझा म्हणाले, कला अकादमीच्या नुतनीकरणाच्या नावाने गोवेकरांची फसवणूक सुरू आहे. सुरवातीला या कामाचे बजेट 39 कोटी रूपये होते. नंतर ते 49 कोटी रूपये झाले, नंतर 59 कोटी रूपये झाले आणि आता ते 95 कोटी रूपयांवर गेल्याचे कळते. दोन्ही मंत्री याला जबाबदार आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

Kala Academy Slab Collapsed:
Danielle McLaughlin Murder Case: आरोपी विकट भगतची जामिन याचिका हायकोर्टाने फेटाळली

पीडब्ल्यूडी विभागाच्या अहवालानंतर बोलेन ः मंत्री गोविंद गावडे

जो भाग कोसळला तो कला अकादमीच्या इमारतीचा भाग नव्हता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन. ही इमारत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हवाली केल्याने काहीही टिपण्णी करणे योग्य ठरणार नाही, असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, हा हॉल कला अकादमीच्या मूळ संरचनेचा भाग नसून तो एक वेगळा स्वतंत्र हॉल आहे. त्या सभागृहाला बीम आणि कॉलम नसून फक्त आय बीम होते. त्यामुळे स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालातूनच स्पष्ट होऊ शकेल.

दरम्यान, रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर, तसेच आम आदमी पार्टीच्या नेत्यांनीही कोसळलेल्या भागाची पाहणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com