

पणजी: राज्यातील प्रमुख सांस्कृतिक संस्था असलेल्या कला अकादमीतील विविध प्रलंबित मुद्यांवर तसेच अलीकडील दुरुस्ती कामांमधील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर पाठपुरावा करण्यासाठी कला राखण मांडच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली.
या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व संयोजक देविदास आमोणकर यांनी केले. याप्रसंगी सिसिल रॉड्रिग्ज, ज्ञानेश मोघे, फ्रान्सिस कुएलो, साईश पाणंदीकर, दामोदर कामत, दिलीप प्रभुदेसाई आणि हर्षदा केरकर सोनक हे कलाकार तथा सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित होते.
कला अकादमीने दरवर्षाच्या सुरुवातीला वार्षिक उपक्रमांचे वेळापत्रक जाहीर करावे, ज्यामुळे गोमंतकीय कलाकारांना वेळेआधी नियोजन आणि सहभाग साधता येईल. कोकणी नाट्य स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे योग्यरित्या आयोजन करण्यात आले नाही कला राखण मांडच्या शिष्टमंडळाने सरकारकडे दुरुस्ती खर्च, निविदा प्रक्रिया आणि इतर आर्थिक बाबींवर स्वतंत्र लेखापरीक्षण व चौकशी करण्याची मागणी केली.
कला राखण मांडने मांडलेल्या सर्व मुद्यांवर गांभीर्याने विचार केला जाईल. पायाभूत सुविधा, पारदर्शकता तसेच संस्थात्मक नियोजन या क्षेत्रांत आवश्यक सुधारात्मक पावले तत्काळ उचलण्यात येतील, असे आश्वासन सदस्य सचिव शंकर गावकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.