Kala Academy: कला अकादमीचे अध्यक्षपद तूर्त मुख्यमंत्र्यांकडेच! CM सावंतांचे स्पष्टीकरण; गावडेंबाबतच्या प्रश्नावर टाळले उत्तर

Kala Academy President: कला व संस्कृती खात्याकडून कला अकादमीची कार्यकारिणी व आमसभा नियुक्त करण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येतो. एप्रिलमध्ये या समित्यांची मुदत संपणार होती.
Kala Academy News
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीचे अध्यक्षपद तूर्त मुख्यमंत्र्यांकडेच, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. असे असले तरी कला अकादमीच्या कार्यकारिणीची फेररचना करण्यासंदर्भातील फाईल सरकारकडे निर्णयासाठी दोन महिने पडून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

कला व संस्कृती खात्याकडून कला अकादमीची कार्यकारिणी व आमसभा नियुक्त करण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येतो. एप्रिलमध्ये या समित्यांची मुदत संपणार होती. त्यावेळी गोविंद गावडे हे कला अकादमीचे अध्यक्ष तथा कला व संस्कृती मंत्री होते.

त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मुदतवाढ द्यावी किंवा अन्य समिती नियुक्तीचा विचार सरकारने करावा, अशी शिफारस करणारी फाईल एप्रिलमध्येच कला व संस्कृती संचालनालयातून सरकारच्या विचारार्थ आणि उचित निर्णयासाठी पाठवली होती.

Kala Academy News
Kala Academy: गावडेंना मंत्रिपदावरून कमी केले, तरी कला अकादमीसंबंधीचे प्रश्न प्रलंबित; ‘कला राखण मांड’चे आंदोलन सुरूच

त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिराच्या समितीबाबतही गेल्या दोन महिन्यांत सरकारने निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Kala Academy News
Kala Academy: कला अकादमी, सरकारला न्यायालयाचा दणका! बदनामीचा दावा फेटाळला; ठोठावला 1 लाखांचा दंड

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडील कला अकादमीच्या अध्यक्षपदाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकारांनी आज मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला असता, तूर्त अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी काही शब्दांत हा विषय गुंडाळला. गावडे यांच्यासंदर्भातील आणखीन दोन प्रश्नांना उत्तर देणे त्यांनी टाळले आणि चक्क नमस्कार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com