Kala Academy: कला अकादमीची 47 वी कोकणी राज्य नाट्यस्पर्धा आजपासून रंगमंचावर

कला अकादमीची 47 वी कोकणी नाट्यस्पर्धा आजपासून सुरु होत आहे. 13 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा 22 नाटके सादर होणार आहेत.
Kala Academy |Goa
Kala Academy |Goa Dainik Gomantak

Kala Academy: कला अकादमीची 47 वी कोकणी नाट्यस्पर्धा आजपासून सुरु होत आहे. 13 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा 22 नाटके सादर होणार आहेत. गोव्यातील सारे प्रमुख दिग्दर्शक,अभिनेते, कलाकार, तंत्रज्ञ आणि लेखक यांचा कस या स्पर्धेत लागणार आहे.

कोकणी राज्य नाट्य स्पर्धेचे महत्व अशासाठी आहे की या स्पर्धेमुळे लेखकांकडून कोकणी नाट्यसंहिता लिहिल्या जातात.

तसेच अनेक प्रसिद्ध संहितांचे भाषांतर कोकणीत केले जाते. संहितेसाठी दोन विभागात बक्षिसे असतात. एक, अनुवादासाठी आणि दुसरे स्वतंत्र संहिता लिखाणासाठी.

यंदा अन्य भाषांमधील आठ नाटके या स्पर्धेसाठी अनुवादित झालेली आहेत. सॅम्युअल बेकेट यांचे ‘वेटींग फॉर गोदो’ हे जागतिक पातळीवर एकेकाळी गाजावाजा झालेले, नाटक प्रथमच या स्पर्धेच्या निमित्ताने कोकणीत (खूप-खूप उशिरा का होईना पण) अनुवादित होत आहे.

Kala Academy |Goa
Mapusa Market: म्हापसा मार्केटमध्ये बेकायदा ‘मिनी कॅसिनो’!

सिद्धहस्त अनुवादकार वसंत भगवंत सावंत यांनी ते अनुवादित केले आहे. अनुवाद क्षेत्रात, विशेषत: नाटकांच्या, वसंत भगवंत सावंत यांनी आपले नाव केले आहे. यंदा त्यांनी अनुवादीत केलेली चार कोकणी नाटके या स्पर्धेत आहेत. त्यापैकी तीन नाट्यलेखन स्पर्धेसाठी पात्र आहेत. म्हणजे यावर्षी त्यांनी चक्क तीन नाटकांचा कोकणीत अनुवाद केला आहे.

मुकेश थळी, विमल कारेकर, संदीप वेरेंकर, आसावरी कुलकर्णी, वैभव कवळेकर हे अन्य अनुवादक नाट्यलेखक या स्पर्धेत आहेत.

यावर्षी 8 स्वतंत्र नाटके या स्पर्धेसाठी खास लिहिली गेली आहेत. हे खरे सुचिन्ह आहे. महेश नाईक यांचे तिरंगी फिरंगी (महेश नाईक), गो कोरोना गो (दुर्गा नाईक) इतिहास डॉट कॉम (पूर्णानंद च्यारी), कल्पवास (प्रकाश सरीकर), वाट फातोडेची (शंकर नाईक), अशी ही एक घडवणूक (परेश च्यारी), हिडींबा (तन्वी कामत बांबोळकर) आणि शी! कावळो आपुडला (दीपराज सातोर्डेकर) ही स्वतंत्र नाटके कोकणी साहित्यात या स्पर्धेद्वारे रूजू होत आहेत.

Kala Academy |Goa
Road Construction: रस्तेकाम पूर्ण झाल्यानंतरच पणजीकर कौतुक करतील!

8 अनुवादित आणि 8 स्वतंत्र अशी एकंदर 16 नवी नाटके स्पर्धेत उतरत असतानाच पुंडलिक नारायण दांडे यांनी सुमारे अर्ध शतकापूर्वी लिहिलेले ‘ताची करामत’ हे विनोदी नाटकही या स्पर्धेत आहे.

अर्थात जुने नाटक स्पर्धेत असू नये याचे काही कारण नसले तरी कुठल्या विशेष गुणामुळे किंवा त्यात असणाऱ्या शक्यतेमुळे हे नाटक स्पर्धेत सादर करण्यास संस्थेने निवडले हे कळण्यास मार्ग नाही.

अर्थात, स्पर्धेमुळे नाटक सादर करण्यासाठी एक मंच मिळतो या कारणामुळे अनेक तथाकथित व्यावसायिक नाटकेही या स्पर्धेत सादर केली जात असतात. ‘ताची करामत’ अशाच प्रयत्नाचा भाग असेल का? तसे नसल्यास व एक प्रयोगशील वृत्ती ठेवून तो स्पर्धेत सादर होत असल्यास त्याचे स्वागत करावेच लागेल.

व्यावसायिक दृष्टीकोनातून लिहिली गेलेली काही नाटकेही या स्पर्धेत सादर होणार आहेत. पुंडलिक नायक यांचे सुमारे 40 वर्षापूर्वी गाजलेले ‘पिपळ पेटला’ हे अभिजात नाटक यंदाच्या स्पर्धेत आहे.

ही स्पर्धा म्हणजे चांगली नाटके पाहण्याची संधी आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या साऱ्या संस्था, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ, लेखक व प्रेक्षकांना दै. गोमन्तकच्या शुभेच्छा!

(नाट्य परीक्षण नारायण खराडे हे लिहिणार आहेत. परवापासून वाचा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com