Mapusa Market: म्हापसा मार्केटमध्ये बेकायदा ‘मिनी कॅसिनो’!

म्हापसा मार्केटमध्ये हा मिनी कॅसिनो खुलेआम सुरू असून याबाबत पोलिस व प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
Mapusa Market |Casino
Mapusa Market |CasinoDainik Gomantak

Mapusa Market: म्हापसा येथील बाजारपेठेतील एका दुकानात कथित डिजिटल तसेच व्हिडीओ गेम्स मिनी कॅसिनो जुगार थाटला गेलाय. मार्केटमध्ये हा मिनी कॅसिनो खुलेआम सुरू असून याबाबत पोलिस व प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

म्हापसा पालिकेच्या मालकीच्या या दुकानात काळ्या रंगाच्या पडद्याआड हा मिनी कॅसिनो बिनदिक्कतपणे सुरू आहे. हा मिनी कॅसिनो जुगार खेळण्यासाठी दुकानात संगणक असून त्या माध्यमातून तो जुगार खेळला जातोय.

म्हापसा भाजी व मासळी मार्केटजवळील आळीतील दुकानात हा कथित मिनी कॅसिनो आहे. लकी इलेक्ट्रॉनिक्स नामक इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या दारावर पडदा लावून हा अवैध जुगाराचा धंदा सुरू आहे.

Mapusa Market |Casino
Road Construction: रस्तेकाम पूर्ण झाल्यानंतरच पणजीकर कौतुक करतील!

या परिसरात बाजारासाठी येणाऱ्या लोकांची बरीच वर्दळ असते. त्यामुळे गिऱ्हाईक सहजरित्या मिळू शकते, या हेतूनेच हा जुगार सध्या सुरू केल्याचे समजते. मूळ भाडेकरूला परस्पर दुकान इतरांना देता येत नाही. तरीही काहीजण दुकान भाडेपट्टीवर देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com