Road Construction: रस्तेकाम पूर्ण झाल्यानंतरच पणजीकर कौतुक करतील!

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तयार करण्यासाठी काहीसा वेळ आणि त्रास सहन करावा लागणार आहे, असे मत नगर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले.
Road Construction |Goa
Road Construction |GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Road Construction: एका किलोमीटर अंतरासाठी राज्य सरकार 20-25 कोटी रुपये खर्च करीत आहे. काही अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागले आहे, हेही आम्ही मान्य करीत आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तयार करण्यासाठी काहीसा वेळ आणि त्रास सहन करावा लागणार आहे.

राजधानीतील सर्व रस्ते झाल्यानंतरच पणजीकर कौतुक करतील, असे मत नगर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने बालभवन ते काकुलो मॉल हा स्मार्ट रस्ता गुरूवारी सायंकाळी मंत्री राणे यांच्या हस्ते वाहतुकीस खुला झाला.

याप्रसंगी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) सीईओ तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, नगर विकास खात्याचे गुरुदास पिळर्णकर, मंगेश प्रभुगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थिती होती.

Road Construction |Goa
Goa News: ‘वेदांता’ने कर्नाटकातून खनिज आणले

राणे म्हणाले, विविध सुविधा देणाऱ्या वाहिन्या विविध ठिकाणी असायच्या, परंतु आता सर्व वाहिन्या एका बाजूला आणण्यात आणल्या आहेत. लोकांना ज्या अडचणी आहेत, त्या अडचणींचे निवारण झाल्यानंतर लोकच त्याचे कौतुक करतील.

स्मार्ट सिटीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. लोकांना बऱ्यापैकी सुविधा देण्याचे काम सरकारच्यावतीने करीत आहेत. काही लोक अनेक प्रकारच्या सुविधा पाहिजेत, अशी मागणी करतात. परंतु त्या सुविधा निर्माण करताना अडचणी निर्माण होणारच.

वाळपईत आपण जेव्हा सुशोभिकरण केले होते, तेव्हा आपल्यालाही शिव्या लोक देत होते, परंतु काम पूर्ण झाल्यानंतर हे काम किती योग्य आहे, हे कळते.

स्मार्ट सिटीच्या अंतर्गत खुल्या जागांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. जैवविविधता राखण्याबरोबरच काम करणे आवश्‍यक आहे, सर्व गोष्टींवर टीका करायची म्हटल्यास ती योग्य नाही. ‘जी-20’ हा चार दिवसांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे कामे करण्यास काही अडचणी येणार नाहीत.

Road Construction |Goa
Goa News: पिसुर्ले विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवर यश

अजूनही काम सुरूच

स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच उद्‌धाटन झाले ही बाब, मंत्री विश्‍वजीत राणे यांना निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर राणे यांनी परखड शब्दात उत्तर देताना घरावरील स्लॅबचे उदाहरण दिले.

विशेष म्हणजे काकुलो मॉलच्या चौकात आणि अग्निशमन दलाच्या संरक्षण भिंतीच्या लगतच्या पदपथाचे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.मात्र या रस्त्यावरून वाहतूक सुरू होईल,त्यामुळे आत्तापर्यंत त्रास सोसलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com