Goa monsoon 2025: जोरदार पाऊस आला की घरांचा संपर्क तुटतो, कडशी-मोपा येथील समस्या; नागरिक भीतीच्या छायेखाली

Kadshi Mopa Bridge: पेडणे तालुक्यातील कडशी-मोपा नदीच्या पलीकडे एकूण दहा घरे आहेत. या नदीवर दोन ठिकाणी कमी उंचीचे पूल बांधण्‍यात आले आहेत.
Kadshi Mopa Goa Bridge
Kadshi Mopa BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Emergency Response : पेडणे तालुक्यातील कडशी-मोपा नदीच्या पलीकडे एकूण दहा घरे आहेत. या नदीवर दोन ठिकाणी कमी उंचीचे पूल बांधण्‍यात आले आहेत. जोरदार पाऊस पडला तर या पुलांवरून पाणी वाहते. परिणामी दोन्‍ही बाजूंचा संपर्क तुटतो. यंदाही तीच स्‍थिती उद्‌भवू शकते. प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

या दहांपैकी नऊ घरे एका बाजूला आहेत. जे एकच घर आहे, ते थोर स्वातंत्र्यसैनिक शंकर गाड यांच्‍या कुटुंबीयांचे आहे. पावसाळ्‍यात पूर आला तर या घरातील लोकांना घराबाहेर पडणे कठीण होऊन बसते. विद्यार्थ्यांच्‍या शाळा चुकतात. त्‍यांचे शैक्षणिक नुकसान होते.

Kadshi Mopa Goa Bridge
Mopa Airport: विकासाचं माहिती नाही मोपा विमानतळावरून शेतीत पावसाचं पाणी मात्र आलं; स्थानिक चिंताग्रस्त, रानटी जनावरांचीही भीती

नोकरी, कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांनाही घरी बसल्‍याशिवाय पर्याय नसतो. गेल्या वर्षी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जलसिंचन खात्याचे अधिकारी व स्थानिक पंचायत मंडळासह या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्‍या समस्या जाणून घेतल्‍या होत्या. तसेच पुढचा पाऊस येण्यापूर्वी या पुलाला उंची देण्याची ग्वाही दिली होती. परंतु या घटनेला वर्ष झाले तरी आजही ही समस्‍या कायम आहे.

Kadshi Mopa Goa Bridge
Mopa Airport: ..अन्यथा रस्त्यावर उतरू! ब्लू कॅब टॅक्सी असोसिएशनचा इशारा; 2 दिवसांत स्टॅन्ड खुला करण्याची केली मागणी

राजन कोरगावकर, निमंत्रक-मिशन फॉर लोकल

पावसाळा सुरू झाल्यानंतर आवर्जून आठवण येते ती कडशी-मोपा येथील त्‍या दहा कुटुंबांची. कारण दरवर्षी या घरांचा संपर्क तुटलेला असतो. आमदार, मंत्र्यांनी अनेकदा आश्‍‍वासने दिली, पण त्‍यांची पूर्तता केली नाही. मुख्यमंत्री निधीतून आपत्कालीन सेवेद्वारे या ठिकाणच्‍या पुलांना उंची देऊन सरकारने या घरांना दिलासा द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com