Mopa Airport: ..अन्यथा रस्त्यावर उतरू! ब्लू कॅब टॅक्सी असोसिएशनचा इशारा; 2 दिवसांत स्टॅन्ड खुला करण्याची केली मागणी

Mopa Airport Blue Cab Taxi Stand: ब्लू कॅब टॅक्सी स्टँड संघटनेकडे सेक्युरिटी क्लिअरन नसल्याने दोन महिन्यांपूर्वी हा स्टँड बंद केला आहे.
Mopa Airport Blue Cab Taxi Stand
Mopa Airport Blue Cab Taxi StandDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीएमआर कंपनीने दोन महिन्यांपासून बंद करण्यात आलेला ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड येत्या दोन दिवसांत खुला केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे. नागझर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

सरकारने मोपा विमानतळावर ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड उपलब्ध करून दिला होता. ब्लू कॅब टॅक्सी स्टँड संघटनेकडे सेक्युरिटी क्लिअरन नसल्याने दोन महिन्यांपूर्वी हा स्टँड बंद केला आहे. यामुळे या संघटनेचे सदस्य असलेले टॅक्सी व्यावसायिक संकटात आले आहेत.दोन दिवसांत हा टॅक्सी स्टॅन्ड पुन्हा उपलब्ध करून दिला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनेश गावस, आनंद गावस, संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळी आदींनी दिला.

ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड वाहतूक खात्याने लीजवर घेऊन तो आमच्या ताब्यात द्यावा, यासाठी सरकारला निवेदन सादर केल्याचे यावेळी सांगण्यात आले. विनेश गावस यांनी सांगितले की, ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड बंद असल्याने गेले दोन महिने बँकेचे हप्ते भरता आले नाहीत. तिसरा महिनाही असाच गेला तर बँक वाहन आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

Mopa Airport Blue Cab Taxi Stand
Goa Taxi Issue: "राजकारण करु नका, वेळ आल्यास आमदारांच्या दारावर बसून भीक मागू", टॅक्सीचालकांचा सत्ताधाऱ्यांना संतप्त इशारा

संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळी यांनी ब्लू कॅब टॅक्सी स्टॅन्ड सुरू करण्यात यावा अन्यथा सरकारने तीन महिन्याची नुकसान भरपाई द्यावी. सरकारने याबाबत लगेच निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com