कारवारमधील काळी नदीवरील कद्रा धरणाचे दरवाजे उघडले

दरवाजे उघडल्याने धरण जलाशयातून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह किनाऱ्यापासून पाच मीटर अंतराने वाहू लागला आहे.
Kadra Dam
Kadra Dam Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : कारवारमधील काळी नदीवरील कद्रा धरणाचे चार दरवाजे काल शुक्रवारी उघडण्यात आले. धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका धरणाचे पाणी कद्रा धरण जलाशयात दोन दिवसांपूर्वीच सोडण्यात आले होते. यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

दरवाजे उघडल्याने धरण जलाशयातून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह किनाऱ्यापासून पाच मीटर अंतराने वाहू लागला आहे. धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या मल्लापूर, सिद्धर, किन्नर, हळगा, हुळगा, होटेगाळी व अन्य गावांतील रहिवाश्‍यांची घरे नदी पाण्यापासून किमान पन्नास मीटर दूरवर आहेत. त्यामुळे सध्यातरी या भागात पुराचा धोका नसल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

Kadra Dam
म्हापशात रातोरात उभारला बेकायदा गाडा

केपे येथील कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले आहे. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असून या मुळे या नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

देऊळमळ केपे येथेही कुशावती नदीची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही नदी आता प्रचंड वेगात दुथडी वाहू लागली आहे.

दरम्यान पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने मडगाव - सांगे दरम्यानची वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे कित्येक बस चालकांनी आपल्या बसेस रस्त्यावर न आणल्याने सामान्य वाहतुकीवर ताण आला आहे. बसेस कमी असल्याने प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com