Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Kadamba Transport Workers Strike: ‘आयटक’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस केटीसी चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व पदाधिकारी उपस्थित होते.
Kadamba Transport Workers Strike
Kadamba Transport StrikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कदंब परिवहन महामंडळाने (केटीसी) यंदा ऑगस्टपासून सुरू केलेली इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग मशीन (ईटीएम) सेवा मागे न घेतल्यास कदंब महामंडळाचे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसने (आयटक) १२ नोव्हेंबर रोजी संप पुकारल्याची माहिती कामगार नेते कॉ. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘आयटक’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस केटीसी चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व पदाधिकारी उपस्थित होते. जे वाहक आहेत, त्यांना दोषी ठरवण्यासाठी नवे ॲप म्हणजेच या ‘ईटीएम'' सेवा आणली आहे. या मशीनद्वारे वाहकाने किती तिकीट दिले, याची माहिती अजिबात मिळणार नाही.

Kadamba Transport Workers Strike
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

त्यामुळे हे मशीन वापरणे बंद करण्याची मागणी त्यांनी केली. पाच-दहा रुपयांची गफलत झाली तरी वाहकांना दंड आकारला जात आहे. त्याचबरोबर चुकीनुसार १०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत दंड आकारला जात आहे. त्यामुळे ही महामंडळाची मनमानी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही हा संप पुकारल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडे १८ मागण्या

महामंडळाच्या अनेक बसेस कालबाह्य झाल्यामुळे त्या बंद पडतात. त्वरित ३०० डिझेल बसेस महामंडळाला आणणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक बसेस बंद पडत आहेत आणि त्यांच्या समस्या अधिक आहेत, असे सांगून फोन्सेका म्हणाले, की ‘आयटक’च्या वतीने सरकारकडे १८ मागण्या केल्या आहेत.

Kadamba Transport Workers Strike
Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

कामगारांना ३४ महिन्यांचा फरक द्या

फोन्सेका म्हणाले, की सातव्या वेतन आयोगानुसार कामगारांचा ३४ महिन्यांचा थकीत फरक मिळायला हवा होता, तो अद्याप मिळालेला नाही. त्याचबरोबर जे कंत्राटी पद्धतीवर गेली पाच वर्षे काम करीत आहेत त्यांना सेवेत कायमस्वरुपी करावी. त्याचबरोबर ईव्ही चालकांना कमीत कमी ३५ हजार रुपये वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa PWD Contract Workers Regularization
Goa Hourly Teachers Regularization
Kadamba First Female Bus Driver
Bank Employees Strike September 28 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com