Kadamba Transport: मोठी बातमी! कदंबा भाडेतत्वावर घेणार खासगी बसेस

यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
Kadamba Transport
Kadamba TransportDainik Gomantak

गोव्यातील प्रमुख परिवहन सेवा असलेल्या कदंबा परिवहन मंडळाने (Kadamba Transport Corporation, Goa) मोठा निर्णय घेतला आहे. कदंबा वेगवेगळी आसनक्षमता असलेल्या मिनीबसेस भाडेतत्वावर घेणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गोव्यातील वाहतूक समस्या तसेच, सुरू झालेला पर्यटन हंगाम (Tourism Season) यामुळे वाहतूक सुविधेवर तोडगा काढण्यासाठी खासगी बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कदंबा बस सेवा 23, 27, 31 आणि 40 आसनक्षमता असलेल्या मिनिबसेस भाड्याने घेणार आहे. कंदबा किती बसेस भाड्याने घेणार याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. पण, गोव्यातील मालकांनाच यासाठी निविदा करता येणार आहे. यासाठी गोव्यातील बस मालकांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच, कदंबाच्या ताफ्यात खासगी मिनी बसेस दिसतील.

Kadamba Transport
Donapaula Jetty: दोना पावला जेटीचे काम पूर्ण; एक डिसेंबरला होणार सुरू

अॅप आधारित टॅक्सी सेवा

गोव्यात अनेक दिवसांपासून अॅप आधारित टॅक्सी (App Based Taxi) सेवेवरून वाद होत आहे. मात्र, सरकार अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यावर ठाम असल्याचे वारंवार समोर आले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील याची आवश्यकता अनेकवेळा विशद केली आहे.

गोवा सरकार (Goa Govt) लवकरच 'गोवा टॅक्सी' नावाचं अॅप लॉन्च करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आणि माविन गुदिन्हो यांची गोव्यातील टॅक्सी प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत नवीन अॅप लॉन्च करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात गोव्यात पर्यटकांसह सर्वसामान्य गोवेकरांनाही अॅप बेस्ड टॅक्सीचा अनुभव घेता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com