Archbishop Cardinal Philippe Neri Ferrao: भारतीय जनता पक्षातर्फे आर्च बिशपांचे अभिनंदन

भाजपच्या एसटी मोर्चाचे पदाधिकारी अँथनी बार्बोझा व कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफासियो डायस यांनी अभिनंदन केले.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Archbishop Cardinal Philippe Neri Ferrao एका ख्रिस्ती धर्मगुरूने हिंदू धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नंतर धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिल्यावर गोव्याचे आर्च बिशप कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना तंबी दिली.

ख्रिस्ती धर्मगुरूंनी इतर धर्माच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत असे स्पष्ट शब्दात सांगून चर्चची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आर्च बिशप कार्डिनल फिलीप नेरी फेर्राव यांचे अभिनंदन केले आहे.

मडगावात आज भाजपच्या एसटी मोर्चाचे पदाधिकारी अँथनी बार्बोझा व कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफासियो डायस यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्च बिशपांचे अभिनंदन केले.

योग्यवेळी आर्च बिशपनी ख्रिस्ती धर्मगुरूंना सल्ला व सूचना केली. गोव्यात ख्रिस्ती व हिंदू बांधव आनंदाने व समाधानाने नांदतात. त्यामुळे अशी वक्तव्ये करून हिंदू व ख्रिस्ती समाजामध्ये फूट पाडू नये, असे बार्बोझा यांनी सांगितले.

Goa BJP
Girish Chodankar: पर्वरी मतदारसंघात कायदे धाब्यावर, न्यायाधीश, वकिलांमध्ये पसरलीय भीती; चोडणकरांकडून खंवटे 'लक्ष'

आर्च बिशप कार्डिनल फेर्राव यांनी चांगला संदेश दिल्याचे क्लाफासियो डायस यांनी सांगितले. आमचा देश लोकशाही पद्धतीने चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला हवा तो धर्म पाळण्याची मुभा आहे, असे डायस म्हणाले.

थोड्याच दिवसात गणेशचतुर्थी साजरी होत आहे. त्यावेळी सर्व धर्माचे लोक हिंदूंच्या आनंदात सहभागी होतात. ही परंपरा असल्याचे डायस म्हणाले.

बार्बोझा व डायस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचा इशारा दिल्यानेच चर्चला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com