KTCL चा मोठा डिजिटल धमाका!! आता लाँच होणार 'माझे-ॲप'; मोबाईलवरच मिळणार तिकीट, लाईव्ह लोकेशन आणि बरंच काही

online bus ticket booking ktcl mobile app: कदंब वाहतूक महामंडळातर्फे ‘माझे-ॲप’ ही नवी डिजिटल सेवा चालू जून महिन्याच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.
online bus ticket booking ktcl mobile app
Kadamba TransportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कदंब वाहतूक महामंडळातर्फे ‘माझे-ॲप’ ही नवी डिजिटल सेवा चालू जून महिन्याच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. या माध्यमातून कदंब बसचे तिकीट काढणे, प्रवासकार्ड रिचार्ज करणे, बसचे थेट स्थान (लाईव्ह लोकेशन) पाहणे तसेच पायलट दुचाकी सेवा मागवणे अशा सुविधा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.

गोव्यातील (Goa) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्‍यात येणाऱ्या या उपक्रमामुळे प्रवाशांना बसस्थानकावर जाऊन तिकीट काढण्याची किंवा कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.

online bus ticket booking ktcl mobile app
Goa Panchayat News: मोर्ले पंचायतीच्या सरपंचपदी रुपेश मळीक बिनविरोध

मोबाईलवरूनच तिकीट खरेदी, कार्डमधील शिल्लक रक्कम तपासणे आणि बसची सद्यःस्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे तासन्‌तास बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे रहावे लागणार नाही. पेडणे ते काणकोणदरम्यान धावणाऱ्या कदंब बसेना या व्यवस्थेचा लाभ मिळणार असून रोख व्यवहार कमी करण्यासही मदत होईल. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

त्‍याचबरोबर राज्यातील नोंदणीकृत पायलट दुचाकी चालकांनाही या ॲपशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईलवरून थेट पायलट सेवा मागवता येईल, तर चालकांना अधिक नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘माझे-ॲप’च्या प्रतिनिधी रिबेका लोबो यांनी सांगितले की, नागरिक आणि पायलट चालकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन ही सेवा विकसित करण्यात आली आहे. तर, सॅम्युअल तिमॉथी यांनी सांगितले की, वाहतूक सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि डिजिटल करण्याचा हा प्रयत्नआहे.

online bus ticket booking ktcl mobile app
Goa News: गोव्यासाठी आनंदाची बातमी! राज्याला ‘स्मार्ट गव्हर्नन्स’ सुवर्ण पुरस्कार; दिल्ल्लीत मंत्री गुदिन्होंनी स्वीकारला सन्मान

जूनच्‍या तिसऱ्या आठवड्यापासून प्रारंभ

कदंब बसचे ऑनलाईन तिकीट

प्रवास कार्ड रिचार्ज

शिल्लक रक्कम तपासणी

बसचे लाईव्ह लोकेशन

मोबाईलवरून पायलट सेवा बुकिंग

रोख व्यवहाराला पर्याय

पर्यटकांसाठीही सुविधा उपलब्ध

online bus ticket booking ktcl mobile app
Goa News: CM प्रमोद सावंतांनी घेतली नितीन नबीन यांची भेट; पुष्पगुच्छ देत केलं अभिनंदन, वाचा दिवसभरातील घडामोडी

भविष्यात आणखी अनेक सेवा

‘माझे-ॲप’द्वारे पुढील काळात अन्नपदार्थ, किराणा सामान, औषधे घरपोच मागवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच वीजतज्ज्ञ, गवंडी, सुतार, आरोग्य सल्ला, योग प्रशिक्षण आणि इतर विविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याची योजनाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com