Kadamba Bus Service: कदंब बसप्रवास आता स्वस्त! स्मार्ट कार्डधारकांना 20 टक्के, नियमित प्रवाशांना 30 टक्के सवलत

Kadamba Smart Transit Card Discount: कदंब वाहतूक महामंडळाने ‘स्मार्ट ट्रान्झिट कार्ड’धारकांसाठी प्रवास सवलतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Kadamba Smart Transit Card Discount
Kadamba Bus ServiceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने ‘स्मार्ट ट्रान्झिट कार्ड’धारकांसाठी प्रवास सवलतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आतापर्यंत मिळणारी १० टक्के सवलत उद्या, १ नोव्हेंबरपासून २० टक्के करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात किमान २५० दिवस या कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नियमित प्रवाशांसाठी जाहीर करण्यात आलेला ‘लॉयल्टी बोनस’. एका वर्षात किमान २५० दिवस स्मार्ट ट्रान्झिट कार्डद्वारे प्रवास पूर्ण करणाऱ्या कार्डधारकांना वर्षपूर्तीनंतर ३० टक्के सवलतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच अन्य कामांसाठी दररोज कदंब बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवासखर्च कमी करण्यासोबतच रोखरहित व्यवहारांना चालना देण्याचाही कदंब महामंडळाचा प्रयत्न आहे.

Kadamba Smart Transit Card Discount
Goa Horticulture Development: गोव्यात आंबा, नारळ, काजू अन् बांबूसाठी स्वतंत्र मंडळे! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा नवा आराखडा

ऑनलाईन अर्जाची सुविधाही: बसस्थानकांवरील नोंदणी शिबिरांव्यतिरिक्त प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेही स्मार्ट ट्रान्झिट कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महामंडळाने https://cashless.ktcl.goa.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. सार्वजनिक बससेवेचा नियमित वापर करणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट ट्रान्झिट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.