Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Kadamba Drivers Protest: कदंब महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या ईव्ही बसची किंमत दोन कोटी रुपये आहे. मात्र या बसच्या कौशल्यपूर्ण चालकांना दिवसाला केवळ ६०० रुपये पगार दिला जातो.
kadamba Drivers Protest
kadamba Drivers Protest Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कदंब महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या ईव्ही बसची किंमत दोन कोटी रुपये आहे. मात्र या बसच्या कौशल्यपूर्ण चालकांना दिवसाला केवळ ६०० रुपये पगार दिला जातो. कदंबच्या बाकी चालकांना महिन्याला ४० हजार रुपये पगार आहे.

हा फरक कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित करून गोवा कामगार संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोंसेको यांनी १५ दिवसांत त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा या चालकांसह कदंब महामंडळाचे सर्व कामगार संपावर जातील, असे मडगावात आयोजित केलेल्या निदर्शनाच्या वेळी सांगितले.

लोकांना ईव्ही बस मानवतात, मात्र ज्या पद्धतीने या बसची देखरेख केली जाते त्यात जास्त लक्ष पुरविणे गरजेचे आहे. या चालकांना महागाई भत्ता, घर भत्ता, ३ टक्के पगार वाढ व महिना ४० हजार रुपये किंवा दर दिवशी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.

kadamba Drivers Protest
Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

या मागण्यासंदर्भात निवेदन आम्ही चार महिन्यांपूर्वी व्यवस्थापनाला दिले आहे, मात्र त्याची दखल अजून कोणीही घेतलेली नाही. सरकार, कदंब व्यवस्थापन व ईव्ही बस कंत्राटदाराने आमच्याकडे संपर्क साधलेला नाही, असे कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले.

kadamba Drivers Protest
Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

तसेच चालकांना एकाच वेळी दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचा आदेश देण्यापूर्वी कामगार संघटनेकडे प्रथम चर्चा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने यात लक्ष घालावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com