Juliao Menezes: डॉ. जुलिओ मिनेझीस यांचा असोळणात पुतळा उभारा, स्वातंत्र्यसैनिकांची मागणी

Juliao Menezes Statue: स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते नाव असूनही डॉ. मिनेझीस यांचे योगदान लोक विसरत चालले आहेत, अशी खंत स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी व्यक्त केली.
Juliao Menezes
Juliao Menezes mansionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा मुक्तिलढ्यात निर्णायक योगदान देणारे, परंतु इतिहासात दुर्लक्षित राहिलेले डॉ. जुलिओ मिनेझीस यांचा पुतळा असोलणा येथील बाजारपेठेत उभारण्यात यावा, अशी औपचारिक मागणी गोवा (दमण-दीव) स्वातंत्र्यसैनिक संघटनेने गृह विभागाच्या अवर सचिवांकडे केली आहे.

हा पुतळा डॉ. मिनेझीस यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याचा जिवंत स्मारक ठरावा, असा या मागणीचा उद्देश असल्याचे पत्रात नमूद केले. संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी सादर केलेल्या या पत्रात नमूद केले की, डॉ. जुलिओ मिनेझीस हे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निकटवर्ती सहकारी होते.

गोव्याच्या मुक्तीलढ्याच्या अंतिम टप्प्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. १८ जून १९४६ रोजी मडगाव येथे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य'वरील बंदी झुगारून आंदोलन करणारे ते पहिले गोमंतकीय होते. त्यांनी डॉ. लोहिया यांना स्वतःच्या असोलणातील घरी बोलावून घेतले आणि याच भेटीतून गोव्यातील मुक्तीलढ्याचे मानसिक व राजकीय अधिष्ठान तयार झाले.

Juliao Menezes
Juliao Menezes: मिनेझिस ज्‍युलियांव यांचे कार्य झाकोळले गेलेय का? क्रांतीदिन सोहळ्यानंतर गोव्यात चर्चा

स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते नाव असूनही डॉ. मिनेझीस यांचे योगदान लोक विसरत चालले आहेत, अशी खंत स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी व्यक्त केली. संघटनेने केवळ पुतळ्याच्या उभारणीचीच नव्हे तर त्याच्या नियमित देखभालीसाठी शासकीय निधीची तरतूद करावी, अशी विनंती केली आहे. तसेच, दरवर्षी १८ जून रोजी असोलणा-वेळी-कुंकळीत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने डॉ. मिनेझीस यांच्या कार्यावर आधारित वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, अशी सुचवणीही केली आहे.

Juliao Menezes
Menezes Mansion: स्वातंत्र्यसैनिकांनी घेतली डॉ. लोहियांची भेट, मिनेझिस मेन्‍शनच्या दालनात रोवली गेली गोव्‍याच्‍या क्रांती पर्वाची बिजे

डॉ. मिनेझीस यांचे कार्य

डॉ. मिनेझीस यांचा राष्ट्रीयतेचा प्रवास त्यांच्या जर्मनीमधील वैद्यकीय शिक्षणादरम्यानच सुरू झाला होता. भारतात परतल्यानंतर त्यांनी १९३९ मध्ये 'गोमंतक प्रजामंडळ'ची स्थापना केली. 'गोमंतक' हे इंग्रजी-कोकणी द्विभाषिक साप्ताहिक सुरू केले. तसेच ''क्लब जुव्हेनाईल द असोळणा'' हे युवक संघटन पुन्हा सक्रिय केले. त्यांच्या घरातील वाचनालयावर पोर्तुगीज राजवटीने धाड टाकली, सभा घेण्यास बंदी घातली आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कारही लादण्यात आला, अशा अनेक हालअपेष्टांचा त्यांना सामना करावा लागला असे पत्रात स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com