दाबोळी चिखलीतील जॉगर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभरणी; दहा कोटी खर्च

हा प्रकल्प दोन टप्प्यात उभारण्याचे ठरवून त्यासाठी 15 कोटी खर्च करण्याचे निश्चित केले होते
Joggers Park

Joggers Park

Dainik gomantak

Published on
Updated on

दाबोळी चिखलीतील जॉगर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभरणी स्थानिक विकासकामांची आमदार व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आली. रुपये दहा कोटी खर्चून जॉगर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे.

यात विविध सोयीसुविधांचा समावेश असणार आहे. चिखलीतील जॉगर्स पार्क येथे आयोजित पायाभरणी समारंभाला मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य अॅड. अनिता थोरात, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, लिओ रॉड्रिग्स, माजी नगरसेवक क्रितेश गांवकर चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, उपसरपंच कमला प्रसाद यादव, सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले, बोगमाळो सरपंच लॉरेना कुन्हा, अन्य पंच सदस्य तसेच कोमुनिदाद पदाधिकारी, दाबोळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Joggers Park</p></div>
झालोर येथे समुद्र किनाऱ्यावर गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

चिखली जर्गस पार्क' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची पायाभरणी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात उभारण्याचे ठरवून त्यासाठी 15 कोटी खर्च करण्याचे निश्चित केले होते. काही वर्षापूर्वी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 6 कोटी खर्च केले होते, अशी माहिती मावीन गुदिन्हो यांनी दिली. चिखली येथे असलेला 'जॉर्गस पार्क प्रकल्प गोव्यातील एक उत्तम प्रकल्प (Project) असून येथे येणाऱ्या नागरिकांना सध्या विविध सुविधांचा लाभ घ्यायला मिळतो. येथे येणाऱ्या मुलांना तरुणांना, महिला, ज्येष्ठ नागरिकांना आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दुसऱ्या टप्याचे काम त्वरित सुरू होणार असून त्यासाठी 10 कोटी खर्च केले जाणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

हे काम पुढच्या एका वर्षात पूर्ण होणार अशी माहिती त्यांनी दिली. दुसऱ्या टप्यात 'जॉगर्स पार्क' प्रकल्पाचे आणखीन नूतनीकरण करण्याबरोबरच येथे आणखीन मोठा आणि उत्तम 'वॉकींगट्रॅक उपलब्ध केला जाणार आहे. तसेच येथे युवक तरुणांसाठी इंन्डोर आणि आऊटडोर व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, 4 योगा कक्ष, फूड कोट, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, शौचालयाच्या संख्येत वाढ करण्यात येईल.

<div class="paragraphs"><p>Joggers Park</p></div>
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात दाखल

'जॉर्गस पार्क' प्रकल्पाजवळच महिला भवन उभारले जाणार असून तेथे महिलांच्या हितासाठी विविधप्रकारचे प्रशिक्षण (बेकरी, शिवण इत्यादी) देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 'जॉर्गेस पार्क'च्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू केल्यानंतरही येथे लोकांना येण्यापासून कुठलीच अडचण नसून तो सर्वांसाठी खुलाच असणार असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. दुसऱ्या टप्यात येथे येणाऱ्या लहान मुलांच्या सांभाळासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भविष्यात दाबोळीतील युवक तरुणांना क्रीडा (Sports) क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी फूटसाल, सेवन अ साईड क्रिकेट मैदान, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल मैदानाचा प्रकल्प उभारण्याच्या कामाला भविष्यात सुरुवात केली जाणार असल्याचे मावीन गुदिन्हो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com