झालोर येथे समुद्र किनाऱ्यावर गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

सापळा रचून कोलवा पोलिसांनी केलं आरोपीला गजाआड
Goa Crime : Zalor Accuse arrest

Goa Crime : Zalor Accuse arrest

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव : झालोर केळशी येथील समुद्र किनाऱ्यावर गांजा विकायला आलेल्या गणेश गंगाधर दासुर (21) या तरुणाला सोमवारी (20 डिसेंबर) रात्री कोलवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

<div class="paragraphs"><p>Goa Crime : Zalor Accuse arrest</p></div>
तृणमुल काँग्रेस हेच गोव्याचं भवितव्य : रेजिनाल्ड

आरोपी तरुण मूळचा हावेरी कर्नाटक येथील असून तो चिंचोणे येथे राहत होता अशी माहिती कोलवाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिली. आरोपीकडून अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा 1.90 किलो गांजा पकडण्यात आला. सोमवारी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान ही कारवाई (Arrest) करण्यात आली.

सदर युवक गांजा विकायला समुद्र किनाऱ्यावर येणार याची माहिती मिळाल्यावर कोलवा पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. रात्री तो गाडीने किनाऱ्यावर आला असता पोलिसांच्या तावडीत सापडला. मंगळवारी आरोपी तरुणाला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड (Arrest) देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com