Goa Akashvani Station: गोव्यातील 'Rainbow' मावळला! आकाशवाणीने बंद केले 30 वर्ष जुने रेडिओ स्टेशन

आकाशवाणी म्हणून ओळखले जाणारे ऑल इंडिया रेडिओ आता गोव्यासाठी बंद होत आहे.
akashvani shutting down fm station in goa
akashvani shutting down fm station in goaDainik Gomantak

akashvani shutting down fm station in goa

गोव्यात असलेले आकाशवाणीचे FM Rainbow हे सर्वात जुने एफएम रेडिओ स्टेशन आता बंद होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रसार भारतीने श्रोते आणि रेडिओ प्रेमींमध्ये झालेली घट पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

akashvani shutting down fm station in goa
Illegal Hoardings In Mapusa: म्हापसा पालिका क्षेत्रात आहेत 65 बेकायदा होर्डिंग्स

गोव्यासोबतच देशाच्या विविध भागांतील एफएम स्टेशनही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑल इंडिया रेडिओने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला गोव्यात चार मेट्रो शहरांसह एफएम केंद्र सुरू केले होते. जवळपास 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारने आता ही केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, गोव्यासारख्या ग्रामीण-शहरी प्रगतीशील राज्यातील केंद्र बंद झाल्यामुळे इंग्रजी बोलणाऱ्या लोकसंख्येकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे FM Rainbow बंद करणे हे चुकीचे आहे, असे मला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com