Job Scam: सांगितले हॉंगकॉंग नेले कंबोडियात! नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; मर्चंट नेव्हीच्या नावाखाली उकळले 8 लाख

Belgaum Job Scam: नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच दोन गंभीर प्रकार उघड झाले आहेत. खोटे आश्वासन देत एका तरुणाला आठ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fake parcel delivery scam
Fake parcel delivery scamDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे खोटे आश्वासन देत तरुणांना फसवून थेट कंबोडियात नेऊन सायबर गुन्हे करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी प्रसन्न हुंद्रे (रा. महात्मा फुले रोड, बेळगाव), आसिफ (रा. अळवण गल्ली, बेळगाव) आणि एका अमित नामक तरुणाच्या विरोधात फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेळगाव येथील ओमकार, संस्कार व आकाश या तरुणांना संशयित आरोपींनी हाँगकाँग येथे डाटा एंट्रीचे काम असून मासिक एक लाख रुपये पगार मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.

या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या भावासह अन्य दोघांना नोकरी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. या नोकरीसाठी व्हिसा, तिकीट, कागदपत्रे व इतर खर्चाचे कारण पुढे करून आरोपींनी प्रत्येकाकडून ९५ हजार रुपयांप्रमाणे आगाऊ स्वरूपात घेतले. मात्र, हाँगकाँगला नेण्याऐवजी संशयितांनी या तरुणांना कंबोडिया येथे नेले.

नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच दोन गंभीर प्रकार उघड झाले आहेत. पहिल्या प्रकारात मर्चंट नेव्हीत नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत एका तरुणाला आठ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे खोटे आश्वासन देत तिघा तरुणांना फसवून थेट कंबोडियात नेऊन सायबर गुन्हे करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Fake parcel delivery scam
Job Scam: "रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि कमवा 5 ते 8 हजार", MPच्या तरूणाने गोव्यात बसून केला स्कॅम! मुंबईच्या व्यक्तीकडून लुटले 6 लाख

‘मर्चंट नेव्ही’त नोकरीसाठी आठ लाखांना घातला गंडा

मर्चंट नेव्हीत नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत एका तरुणाची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे सतीश शेवडे (रा. मुजावर गल्ली, बेळगाव), शिवाजी सुतार (रा. रिंग रोड, कोल्हापूर) आणि समीर पाटील (रा. मुंबई, महाराष्ट्र) अशी आहेत. या तिघांनी मिळून परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादी चंद्रशेखर बाबू पुजारी (रा. तिसरा क्रॉस, महाद्वार रोड, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देतो, असे सांगत सुरुवातीला विश्वास संपादन केला.

Fake parcel delivery scam
Goa Fraud Case: फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 25 लाखांचा गंडा; दाबोळीतील दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानंतर २१ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण, कागदपत्रांची प्रक्रिया, वैद्यकीय तपासणी तसेच इतर खर्चाचे कारण पुढे करत फिर्यादीकडून पैसे उकळले. या कालावधीत फिर्यादीकडून एकूण ८ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत

नमूद आहे. मात्र, पैसे परताव्यासाठी सतत तगादा लावल्यानंतर ५० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित साडे सात लाख रुपयांची रक्कम अजून मिळायची आहे. यासंदर्भात पुजारी यांनी वारंवार संपर्क साधून विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. तसेच, वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक केल्याचे तक्ररीत म्हटले आहे. मार्केट पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com