Goa Fraud Case: फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 25 लाखांचा गंडा; दाबोळीतील दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Fraud Case: गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा समोर आली आहे.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोव्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा समोर आली आहे. दाबोळी येथील एका फ्लॅटचा व्यवहार करताना एका महिलेची तब्बल २५.७४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेला दाबोळी येथील एक जुना, 'अनफर्निश्ड' दोन बेडरूमचा फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवले होते. हा व्यवहार निश्चित झाल्यानंतर, डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपींनी महिलेकडून आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) म्हणून वेळोवेळी हप्त्यांच्या स्वरूपात पैसे घेतले. विश्वासापोटी महिलेने एकूण २५ लाख ७४ हजार रुपये या दाम्पत्याला सुपूर्द केले. मात्र, वर्षभर पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा मिळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते.

Goa Fraud Case
Goa Crime: एका क्षणाचा राग अन् संसाराची राखरांगोळी! नवऱ्याशी भांडण होताच बायकोनं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं हादरलं सांकवाळ

पीडित महिलेने जेव्हा व्यवहाराची पूर्णता करून 'सेल डीड' (विक्री करार) करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पूर्ण रक्कम हातात पडल्यानंतरही आरोपींनी ना फ्लॅट नावावर केला, ना घेतलेली रक्कम परत केली.

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन आणि विश्वास संपादन करून आपली मोठी आर्थिक लूट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Goa Fraud Case
Goa ZP Election: दक्षिण गोव्यात संधी होती, पण काँग्रेसनेच ती घालवली; पाटकरांविरोधातील तक्रार आता हाय कमांडच्या दरबारी!

वास्को पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयित दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या संबंधित कलमान्वये फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com