Goa Tourism: कारवाईचा तडाखा कायम; बागा किनाऱ्यावर अवैध फेरीवाल्यांचे साहित्य जप्त

पर्यटन विभागाच्या विशेष पथकाने केली कारवाई
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

राज्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी गोवा सरकारने नियमावली कडक केली आहे. पर्यटन खात्याने एका आदेशाद्वारे पर्यटन क्षेत्रातील अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी वेगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसारअर्थिक दंडाची तरतूद ही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज बाग समुद्रकिनारी पर्यटन विभागाने कारवाई केली आहे.

(Special squad of tourism dept goa raids illegal hawkers at Baga beach)

Goa Tourism
Goa News: मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये, नृत्यातही घेतला सहभाग

पर्यटन विभागाचा अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या किनाऱ्यावर वस्तु विक्रीकरणाऱ्यांना चाफ बसावा यासाठी कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर बागा समुद्रकिनारी अवैध फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.

Goa Tourism
Subhash Shirodkar: 200 सहकारी संस्था सुरू होणार

गोव्यात पर्यटकांना लुटण्यासंदर्भात घडणारे प्रकार आणि पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी पर्यटन विभाग आता सक्रिय झाला आहे. पर्टनाटन विभागाच्या नियमानुसार किनाऱ्यावर वस्तुविक्रीसाठी सरकारकडे नोंदणी करुन त्यानुसार विक्री होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने पर्यटन विभागाने आज कारवाई केली. यात समुद्रकिनाऱ्यावर काही फेरीवाले अवैधरित्या वस्तुंची विक्रीकरत असल्याचे पर्यटन विभाग विशेष पथकाच्या निदर्शनास आल्याने पथकाने कारवाई केली आहे.

पर्यटन हंगाम सुरु असल्यामूळे पर्यटकांनी राज्यातील किनारे फुलले आहेत. याचा फायदा घेत अवैधरित्या वस्तुंची विक्री सुरु असल्याची माहिती पर्यटन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथके तयार केली व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जप्त केलेल्या वस्तुंची किंमत समजू शकलेली नसली तरी पर्यटन विभागाने ही कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com