Vijai Sardesai Vs Jit Arolkar: उड्या मारणारे ‘लापीट’ आणि रंग बदलणारे ‘शेड्डें’ : विजय सरदेसाई

Vijai Sardesai Vs Jit Arolkar: युरींना पाठबळ : मुख्‍यमंत्र्यांनी आधी कोकणी शिकावी!
Vijai Sardesai Vs Jit Arolkar
Vijai Sardesai Vs Jit ArolkarDainik Gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai Vs Jit Arolkar

विराेधी पक्षनेेते युरी आलेमाव यांनी जीत आरोलकर यांचा ‘लापीट’ म्‍हणून उल्‍लेख केल्‍यानंतर सध्‍या तो वादाचा विषय बनलेला असतानाच, आज विजय सरदेसाई यांनी युरी आलेमाव यांच्‍या बाजूने खंबीरपणे उभे राहताना ‘लापीट’ हा असंसदीय शब्द नाही.

कोकणीत हा सहज वापरला जाणारा शब्द आहे. ‘लापीट’ या शब्दाचा अर्थ ‘मस्‍तखोर’ असा हाेताे. मुख्‍यमंत्र्यांनी कोकणी शब्दकोष चाळून पाहावा, असा सल्‍ला दिला. सरदेसाई म्हणाले, मुख्‍यमंत्र्यांना कुठली भाषा कळते, ते मला माहीत नाही.

Vijai Sardesai Vs Jit Arolkar
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

सुदिन ढवळीकरांचे मंत्रिपद अस्थिर

सध्‍याच्‍या भाजप सरकारात सुदिन ढवळीकर यांची खुर्ची स्‍थिर नाही. ज्‍यांना लापीट म्‍हटले म्‍हणून सध्‍या एवढा गदारोळ माजला आहे, त्‍याच जीत आरोलकर यांना ढवळीकर यांना मंत्रिपदावरून काढून त्‍यांच्‍या जागी आणायचा बेत रचला जात आहे. त्‍यामुळे आपली खुर्ची वाचविण्‍यासाठी ढवळीकर यांना भाजपची तळी उचलून धरावीच लागते. असेही सरदेसाई म्‍हणाले.

असे आठ लापीट गोव्यात :

गाेव्‍यातील राजकारणात असा एकच ‘लापीट’ नाही, तर आणखी आठ लापीट आहेत, ज्‍यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेतली. अशा उड्या मारणाऱ्यांना लापीट म्‍हणणार नाही तर काय, ‍असा प्रश्‍न सरदेसाईंनी केला. त्‍यापूर्वी विराेधी पक्षनेते आलेमाव यांनी ‘लापीट’ हा साधा शब्द आहे आणि तो उच्‍चारताना मी कुणाचेही नाव घेतले नाही, असे स्‍पष्‍ट केले. भाजप सरकारच लापीट आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com