Jetpatcher Machine: ‘जेट पॅचर’ मशीन गोव्यात ठरतेय कुचकामी; सरकारी तिजोरीला तोटा झाल्याचा दावा

Former Minister Nilesh Cabral: तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आणलेले जेट पॅचर मशीन खड्डे बुजवण्यात अयशस्वी
Former Minister Nilesh Cabral: तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आणलेले जेट पॅचर मशीन खड्डे बुजवण्यात अयशस्वी
Jetpatcher Machine Dainik Gomantak
Published on
Updated on

तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी मोठ्या थाटात आणलेले जेट पॅचर मशीन गोव्यात कुचकामी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मशीनद्वारे बुजवण्यात आलेले खड्डे लगेच पुन्हा पडत असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून आले.

कोट्यवधी रुपये खर्च करून भाडपेट्टीवर आणलेल्या मशीनचा फायदा होण्याएवजी सरकारी तिजोरीला तोटा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत.

२०२२ मध्ये काब्राल यांनी जेट पॅचर मशीन आणून ताळगाव येथील खड्डा बुजवून दाखवला होता. तेव्हा तेथे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.

२०२४ पर्यंत परिस्थिती बदलली असून नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्यांनी आणलेल्या जेट पॅचर मशीनची अवस्थाही बिघडली. जेट पॅचरकडून बजुवण्यात आलेले खड्डे लगेलच पुन्हा पडत असल्याच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत.

खड्डे बुजवताना १८ महिन्यांची हमी कंत्राटदाराने दिल्याचे काब्राल यांनी सांगितले होते. काम विफल झाल्यास कंत्राटदार स्वखर्चाने ते करणार असल्याचे देखील ते म्हणाले होते. मात्र, जेट पॅचर मशीनच्या कामागिरीने निराशा झाली आहे.

Former Minister Nilesh Cabral: तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आणलेले जेट पॅचर मशीन खड्डे बुजवण्यात अयशस्वी
Goa News: GIDC चे 'सेझ' प्रकरणात तब्बल 17 कोटींचे नुकसान

गेल्या वर्षी विधानसभा अधिवेशनात हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला काब्राल यांनी उत्तर दिले होते. त्यात माहिती दिली होती की, जेट पॅचरने राज्यात १ लाख १२ हजार ८३५ खड्डे बुजवले होते. उत्तर गोव्यात सुमारे १ लाख १२ हजार ७२ खड्डे बुजवण्यात आले होते, तर दक्षिण गोव्यात ७६३ खड्डे बुजविले.

त्यांनी पुढे माहिती दिली होती की, उत्तर गोव्यात १ जेट पॅचर कार्यरत आहे आणि दक्षिण गोव्यात ३ कार्यरत आहेत. जेट पॅचर सेवा मेसर्स सर्वशगुन इन्फ्रा प्रा.लि. उत्तर गोव्यासाठी सुरू होण्याची तारीख ६ जुलै २०२२ आहे. आजपर्यंत भरलेली रक्कम ५.७९ कोटी रुपये आणि प्रलंबित रक्कम ०.६५ कोटी रुपये आहे.

जेट पॅचर सेवा मेसर्स मौर्य कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. दक्षिण गोव्यासाठी सुरू होण्याची तारीख २९ डिसेंबर २०२२ आहे. भरलेली रक्कम २.१६ कोटी रुपये आणि प्रलंबित रक्कम २.४६ कोटी रुपये असल्याचे उत्तरात स्पष्ट केले होते.

कोट्यवधींचा अपव्यय

कोट्यवधी रुपये जेट पॅचर मशीनवरती खर्च करून त्याची परतफेड झालेली नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गोव्यातील पावसाची तीव्रता पाहाता जेट पॅचर मशीनचा जास्त उपयोग नाही. मशीनद्वारे बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांची गत पाहता हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी अनेक सरळ, सोपो आणि स्वस्त दरात उपाय उपलब्ध आहेत. जेट पॅचर मशीन पाहण्यात आकर्षक वाटते. परंतु गोव्यात ते कुचकामी ठरले आहे.

Former Minister Nilesh Cabral: तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आणलेले जेट पॅचर मशीन खड्डे बुजवण्यात अयशस्वी
Khandola Road : रायबंदर रस्ता वाहतुकीस धोकादायक; वाहनचालकांना त्रास

कर्नल मिलिंद प्रभू, रस्ता तज्ज्ञ

जेट पॅचर मशीन गोव्याच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात अयशस्वी ठरले; कारण खड्डे बुजवण्यासाठी प्रथम त्यातून पाणी काढून तळ कोरडा करावा लागतो. नंतर तापलेला बिटूमेन तेथे घालून तो बुजवण्यात येतो. जेव्हा दोन्ही गोष्टी योग्यरीत्या केल्या जातात तेव्हा त्यांचे एकत्रीकरण होऊन खड्डा बुजवला जातो; परंतु गोव्यात हे योग्यरीत्या न झाल्याने बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा पुन्हा उखडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com