Khandola Road : रायबंदर रस्ता वाहतुकीस धोकादायक; वाहनचालकांना त्रास

Khandola Road : पावसामुळे अवघ्या चार दिवसांत रस्त्यांची चाळण
Khandola
Khandola Dainik Gomantka

Khandola News :

खांडोळा, इमेजन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयपीएससीडीएलने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी रायबंदर रस्ता बंद केला. १० मार्च ते ३१ एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. हा रायबंदर ३१ मे पर्यंतही स्मार्ट सिटीच्या कामासाठी बंद होता.

विविध वाहिन्या टाकण्याचे रात्रंदिवस काम सुरू होते, पण दिलेल्या मुदतीत रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. रायबंदर फेरीबोटीपासून पुढे पूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे. त्यातून वाहन हाकणे कठीण झाले आहे.

Khandola
Go First नंतर आणखी एक एअरलाइन्स अडचणीत, SpiceJet वर टांगती तलवार

मुदत संपल्यानंतरही कामे अर्धवट!

रायबंदर रस्त्याचे काम चार टप्प्यात करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. परंतु मुदत संपल्यानंतरही अनेक कामे बाकी आहेत. कुठेही डांबरीकरण केलेले नाही. फक्त खड्ड्याच्या ठिकाणी ओबडधोबड डांबर घातलेला आहे. काही ठिकाणी पावसात सिमेंट काँक्रिट घातल्याने ते बाजूला गेले, त्यामुळे त्याठिकाणी खड्डा पडला. रायंबदरहून पुढे फोंडवेपर्यंत अनेक ठिकाणी फक्त खड्डेच दिसतात. पावसात त्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहने चालविणे कठीण होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com