Jennifer Monserrate Political Career: जेनिफर होत्या मुक्तीनंतरच्‍या सहाव्‍या महिला मंत्री!

Jennifer Monserrate Political Journey: गोव्‍याला मुक्ती मिळाल्‍यापासून आतापर्यंतच्‍या ६५ वर्षांच्‍या काळात सहावी महिला मंत्री होण्‍याचा मान जेनिफर मोन्‍सेरात यांनी मिळवला होता.
Jennifer Monserrate Political Career
Jennifer Monserrate Political CareerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्‍याला मुक्ती मिळाल्‍यापासून आतापर्यंतच्‍या ६५ वर्षांच्‍या काळात सहावी महिला मंत्री होण्‍याचा मान जेनिफर मोन्‍सेरात यांनी मिळवला होता. माजी मुख्‍यमंत्री स्‍व. शशिकला काकोडकर, व्‍हिक्‍टोरिया फर्नांडिस(मामी), संगीता परब, निर्मला सावंत आणि एलिना साल्‍ढाणा यांच्‍यानंतर २०१९ मध्‍ये जेनिफर यांच्‍या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली होती.

गोव्‍याच्‍या पहिल्‍या महिला मंत्री बनण्‍याचा मान माजी मुख्‍यमंत्री स्‍व. शशिकला काकोडकर यांना मिळाला होता. १९७२ मध्‍ये त्‍यांची राज्‍यमंत्रिपदी वर्णी लागली होती. त्‍यानंतर त्‍यांचे वडील तथा पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. दयानंद बांदोडकर यांच्‍या निधनानंतर १९७३ मध्ये त्‍यांनी मुख्‍यमंत्रिपदाची सूत्रे स्‍वत:कडे घेतली आणि १९७९ पर्यंत त्‍या मुख्‍यमंत्रिपदावर कायम होत्‍या.

१९९८–९९ या काळात लुईझिन फालेरो आणि १०९९–२००० या काळात फ्रान्‍सिस सार्दिन मुख्‍यमंत्रिपदी असताना सांताक्रुजच्‍या आमदार असलेल्‍या व्‍हिक्‍टोरिया फर्नांडिस यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.

Jennifer Monserrate Political Career
Goa Monsoon: 49 दिवसांतील पावसापैकी 50 टक्‍के केवळ 8 दिवसांत, आतापर्यंत 38.93 इंचांची नोंद; तूट 37 टक्‍क्‍यांवर

फर्नांडिस यांच्‍यानंतर १९९४ मध्‍ये काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या संगीता परब यांना तत्‍कालीन सरकारमध्‍ये शिक्षणमंत्री होण्‍याचा मान मिळाला. १९९९ मध्‍ये निर्मला सावंत यांच्‍या रुपाने आणखी एक महिला तत्‍कालीन काँग्रेसच्‍या मंत्रिमंडळात आली.

परंतु, वनमंत्री या नात्‍याने ८ जून १९९९ ते २४ नोव्‍हेंबर १९९९ असे पाचच महिने काम करता आले. त्‍यानंतर २०१२ मंत्री एलिना साल्‍ढाणा यांना मंत्रिपद मिळाले. त्‍यानंतर २०१९ मध्‍ये डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या मंत्रिमंडळात जेनिफर मोन्‍सेरात यांना मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली.

Jennifer Monserrate Political Career
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

काँग्रेसला सोडचिठ्ठी, मंत्रिपदाची माळ

२०१७ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर तत्‍कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली दहा आमदारांनी काँग्रेसचा त्‍याग करून भाजपात प्रवेश केला. त्‍यात जेनिफर मोन्‍सेरात यांचाही समावेश होता. त्‍या दहा आमदारांपैकी बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्‍स आणि जेनिफर मोन्‍सेरात या तिघांची मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिपदी वर्णी लावली होती.

स्‍टँपड्यूटी कमी करण्‍यासाठी आणले होते दुरुस्‍ती विधेयक

जेनिफर मोन्‍सेरात यांनी २०१९ ते २०२२ या काळात मंत्री म्‍हणून महसूल, आयटी खात्‍याचा कारभार हाताळला. महसूलमंत्री या नात्‍याने बक्षीसपत्र, गहाणखतांवरील स्‍टँपड्यूटी कमी करण्‍यासाठी त्‍यांनी दुरुस्‍ती विधेयक आणले होते. शिवाय आयटी खात्‍याच्‍या माध्‍यमातून महसूल खात्‍यातील सेवा डिजिटल पद्धतीने देण्‍यावरही त्‍यांनी भर दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com