पणजी: राज्यातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्याघ्रक्षेत्राची घोषणा करावी तसेच अंगणवाडीसाठी देण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी आज वन, नगरनियोजन, नगरपालिका तसेच महिला व बालविकास खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी विधानसभेत केली.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील लोकांकडून आलेल्या सूचनांवर सरकारने विचार केला पाहिजे. त्याचबरोबरच पर्यावरणाचेही रक्षण करावे, अशी सूचना जेनिफर यांनी केली. राज्यातील अंगणवाडींची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे सरकारने अंगणवाड्यांना परवानगी देण्यापूर्वी तेथे आवश्यक साधनसुविधा आहेत की नाही याची पाहणी करावी.
अंगणवाड्यांसाठी भाडेपट्टीची रक्कम खूपच कमी असल्याने त्या चालवणे कठीण होत आहे. ताळगावात १३ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना ताळगाव पंचायतीकडून मदत केली जाते. अंगणवाडी कर्मचारी व मदतनिसांना देण्यात येणारी रक्कमही कमी असल्याने त्यांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणी जेनिफर यांनी केली. तसेच तेथील मुलांना नाचणीचे अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असेही त्या म्हणाल्या.
अंगणवाडीतील मुलांना तसेच गरोदर महिलांना पॅकबंद कडधान्य तसेच पीठ देऊ नये. त्यांना पूर्वी ज्या प्रकारे कडधान्य महिन्याकाठी दिले जात होते, तसेच द्यावे, अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी केली. जमिनीतील झाडे तोडण्यास परवानगी देताना तेथे नवीन झाडे लावण्याची सक्ती करावी. बोंडला अभयारण्यात असलेल्या वन्यजीवांसाठी पिंजऱ्यात पुरेशी जागा उपलब्ध करावी, जेणेकरून त्यांना मोनमोकळेपणे फिरता येईल, असेही त्या म्हणाल्या
सध्याच्या अंगणवाड्यांना शौचालये नाहीत. लहानशा खोलीत त्या चालविल्या जातात. तेथील जागा खूपच कमी पडत असल्याने मुलेही सुरक्षित नाहीत.
जेनिफर मोन्सेरात, आमदार (ताळगाव)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.