Anjuna Beach in Goa: गोवा जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देत असतात.
अलिकडे गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्याच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, एका देशाने गोव्याला जाणाऱ्या त्यांच्या देशातील पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गोव्यात एका बीच भागात फसवणूक, चोरी आणि खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे देशाच्या दूतावासाने म्हटले आहे.
कोणता देश आणि काय आहे इशारा?
जपान या देशाने गोव्याला येणाऱ्या त्यांच्या देशातील पर्यटकांसाठी ही नियमावली जारी केली आहे. "गोव्यातील हणजुणे बीचवर जपानी पर्यटकांना बेकायदेशीरपणे अडवणूक करणे, फसवणूक, खोटे गुन्हे आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांना टार्गेट करणाऱ्या अशा दललांपासून सतर्क राहा." असे मुंबईतील जपानच्या दूतावासाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
"मागील वर्षी एप्रिल महिन्यात 59 वर्षीय पर्यटक महिलेल्या अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. महिला राहत असलेल्या भाडे घराच्या समोर पार्क केलेल्या स्कूटरमध्ये अमली पदार्थ सापडले होते."
तसेच, "अशाच प्रकारची घटना कोरोना संसर्गाच्या पूर्वी देखील घडली होती. कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या विविध देशातील तसेच, जपानी पर्यटकांची संख्या वाढली आहे.
अशात या भागात गुन्हेगार देखील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना लक्ष करून घडणाऱ्या घटना वाढण्याची शक्यता आहे." असे जपानच्या पत्रकात म्हटले आहे.
पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन काय म्हणाले?
जपानी पर्यटकांना टार्गेट केलं जात असल्याची एकही घटना समोर आलेली नाही. मुंबईतील जपानच्या दूतावासाकडून गोवा पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.