म्हादई नदीत आंघोळीसाठी उतरलेला जम्मू काश्मीरचा रहिवासी असणारा कामगार बुडाल्याची घटना उघडकीस आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
तर, वीकेंडला दृष्टी सागरी जीवरक्षकांनी राज्यात विविध ठिकाणी केलेल्या बचावकार्यात पाच जणांना जीवदान दिले. यात कोलवा येथे तीन वर्षीय बाळाचा देखील जीव वाचविण्यात त्यांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गांजे-उसगाव येथील म्हादई नदीत गुलाम मोहम्मद (वय 25, रा. जम्मू काश्मीर) आंघोळीसाठी उतरला होता. यावेळी तो बुडाल्याची माहिती समोर आली असून, अग्निशमन दल बेपत्ता कर्माचाऱ्याचा शोध घेत आहेत.
दृष्टी सागरी जीवरक्षकांनी गेल्या वीकेंडला राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या पाच जणांना जीवदान दिले. यात कोलवा येथे समुद्राच्या लाटेसह आत वाहत गेलेल्या तीन वर्षाच्या लहान बाळाला देखील जीवदान देण्यात आले.
दृष्टीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर नशेत समुद्राच्या पाण्यात गेलेल्या कर्नाटकच्या 25 वर्षीय तरूणाला दृष्टीच्या रक्षकांनी जीवदान दिले. तसेच, कांदोळी येथेच दहा जणांचा ग्रुपमधील एकजण समुद्राच्या खोल पाण्यात गेला, त्याला जीवरक्षकांनी सुखरुप बाहेर काढले.
याशिवाय हणजुणे येथे हैद्राबादच्या पर्यटकाला, कळंगुट येथे महाराष्ट्रातील पर्यटक आणि गालजीबाग येथे हैद्राबादच्या पर्यटकाला जीवदान देण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.