गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या 'त्या' आरोपांची सीबीआय करणार चौकशी

'रा. स्व. संघाचे नेते आणि अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी मिळाली होती ३०० कोटींची ऑफर'
Ex-Governor Satya Pal Malik
Ex-Governor Satya Pal MalikDainik Gomantak

Ex-governor Satya Pal Malik : गोव्याचे माजी राज्यपाल तसेच मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक केलेल्या त्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्याचे समोर येत आहे. राज्यपाल मलिक यांनी रा. स्व. संघाचे नेते आणि अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती, असा दावा केला होता. त्याचप्रकरणी आता सीबीआय चौकशी होणार आहे. (Jammu and Kashmir recommends CBI probe into ex-governor Satya Pal Malik's bribe allegation)

मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते आणि अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती असा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) प्रशासनाने सीबीआयकडे (CBI) चौकशीची शिफारस केली आहे.

राजस्थानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाले तेव्हा त्यांच्याकडे दोन फाईल्स आल्या होत्या. एका फाईलमध्ये अंबानींचा (Ambani) समावेश होता, तर दुसरी आरएसएसचा वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधीत होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणवायचे.

राज्यपालांनी सांगितले होते की, ज्या विभागांच्या या फायली आहेत, त्यांच्या सचिवांनी त्यांना या फायलींमध्ये भ्रष्टाचार असल्याचे सांगितले होते. आणि सचिवांनीही त्यांना सांगितले होते की या दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात. पण, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल (Governor of Meghalaya) आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com