Canacona News : लाकूड चिरकामासंबंधी संशयाचे वलय कायम

‘जागृत काणकोणकारां’कडून चौकशी : तामणे-लोलयेतील शासकीय सुतारकाम केंद्रात चिरकाम
Canacona
Canacona Dainik Gomantak
Published on
Updated on

श्रमधाम घरांसाठी वन खात्याच्या मणे येथील जंगलातून इमारती लाकूड आणून तामणे-लोलये येथील शासकीय सुतारकाम केंद्रात चिरल्यासंबंधीचे संशयाचे वलय अद्याप कायम आहे. यासंदर्भात विकास भगत व जनार्दन भंडारी यांच्याव्यतिरिक्त जागृत काणकोणकारांच्या वतीने शांताजी नाईक गावकर, प्रशांत नाईक, संदेश तेलेकर, नगरसेवक धीरज नाईक गावकर, जॅक फर्नांडिस व इतरांनी शुक्रवारी (ता.28) क्षेत्रीय वनाधिकारी आनंद मेस्त्री यांची भेट घेऊन या संशयास्पद इमारती लाकडासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

Canacona
Churchill Alemao: नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान कधीही पहिला नाही; मन की बात@100 नंतर चर्चिल म्हणाले की...

यावेळी क्षेत्रीय वनाधिकारी मेस्त्री यांनी हे लाकूड लिलावाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच उचलण्यात येऊन ते चिरण्यात आले असल्याची कबुली दिली. 19 एप्रिल रोजी लिलाव झाला. बोलिदाराने मात्र वन खात्याच्या तिजोरीत 24 एप्रिल रोजी पैशांचा भरणा केला.

मात्र, त्यापूर्वीच वन खात्याला न कळविता हत्तीपावल येथील गेटवरून लाकडाची वाहतूक करण्यात आली याची माहिती मिळताच तामने येथील शासकीय सुतारकाम केंद्रावर कर्मचाऱ्यांना पाठवून लाकूड चिरण्याचे काम बंद केले. त्याचप्रमाणे लाकडाची मोजदाद करण्यात आली हे मेस्त्री यांनी स्पष्ट केले.

Canacona
Sanquelim Municipal Council Election 2023 : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या साखळीत कोपरा बैठका

श्रमधाम योजनेखाली बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी तामने-लोलये येथील शासकीय सुतारकाम केंद्रात सर्व सोपस्कार पूर्ण करून लाकूड चिरण्यात आले आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आहेत, असे आज श्रीस्थळ येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सभापती रमेश तवडकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितले.

"श्रमधाम योजनेखाली ज्यांची घरे उभारण्यात येत आहेत त्यांना पावसाळ्यापूर्वी आपल्या घरांवर छप्पर पडावे, अशी अपेक्षा होती. त्यासाठी उच्च पातळीवरून सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने विरोधकांत संशय निर्माण झाला. या लाकडात सागवानी लाकूड नसून फक्त किनळ, माडत व‌ निलगिरीची लाकडे आहेत."

आनंदु देसाई, सरपंच, खोतीगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com