Sanquelim Municipal Council Election 2023 : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या साखळीत कोपरा बैठका

शाश्वत विकासाला साथ देण्याचे आवाहन : पालिकेत कमळ फुलवून मुख्यमंत्र्यांना साथ द्या!
Sanquelim Municipal Council Election campaign
Sanquelim Municipal Council Election campaign Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी नगरपालिका निवडणुकीत भाजपने आपला आक्रमक पवित्रा कामय राखला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जरी या मतदारसंघाचे आमदार असले तरी या नगरपालिकेवर यावेळी भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपने सर्व पातळ्यांवर बरीच कंबर कसली आहे.

आता या निवडणूक प्रचारात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उडी घेतली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तानावडे यांनी साखळी नगरपालिकेच्या तब्बल आठ प्रभागांसाठी मॅरेथॉन कोपरा बैठका घेतल्या.

Sanquelim Municipal Council Election campaign
Ponda Municipal Council Elections 2023 : प्रभाग पुनर्रचना, आरक्षणामुळे वाढली रंगत; प्रचारावर शेवटचा हात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या नगरपालिकेची जबाबदारी जितकी स्वतःवर ठेवली आहे, तितकीच या प्रचाराची व जिंकण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही स्वीकारली आहे.

त्यासाठी साखळी नगरपालिका क्षेत्रातीलच नव्हे तर मतदारसंघातील व मतदारसंघाबाहेरील लोकांशीही संपर्क करून पक्षाच्या सर्व उमेदवारांना कशाप्रकारे जास्तीत जास्त मतदान होणार यावर भर दिला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी साखळीच्या प्रभाग क्र. १, २, ३, ४, ९, १०, ११, १२ या प्रभागांसाठी मॅरेथॉन कोपरा बैठका घेतल्या. या बैठकांना लोकांचीही बरीच उपस्थिती होती. साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांच्यासमवेत प्रभाग १ चे उमेदवार यशवंत माडकर, २च्या निकिता नाईक, ३च्या सिध्दी पोरोब, ४च्या रश्मी देसाई, ९चे आनंद काणेकर, १०चे दयानंद बोर्येकर, ११च्या दीपा जल्मी व १२च्या अंजना कामत, तसेच सर्व प्रभागांचे प्रभारीही उपस्थित होते.

Sanquelim Municipal Council Election campaign
Goa Mining : लीजधारकांसमोर आता असंख्‍य अडचणी; खाणव्‍यवसाय लांबणार

माघार घेतलेल्यांचेही केले अभिनंदन

या सर्व बैठकांमध्ये सदानंद तानावडे यांनी सर्व प्रभागांमधील इतर इच्छुक उमेदवार ज्यांनी अधिकृतपणे उमेदवाराची निवड झाल्यानंतर माघार घेतली, अशा उमेदवारांचेही विशेष अभिनंदन केले. यासाठी त्यांनी स्वतःचे उदाहरण देत पक्षासाठी स्वतःच्या अपेक्षांचे बलिदान दिल्यास पक्ष त्या कार्यकर्त्यांची विशेष दखल घेतो, असेही सांगितले.

सुलक्षणा सावंतही प्रचारात सक्रिय

भाजपच्या प्रदेश महिला प्रभारी तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनीही साखळी नगरपालिका निवडणुकीत बराच रस घेतला आहे. सर्व प्रभागांमधील दररोजचा अहवाल घेत त्या प्रत्येक प्रभागातील सद्यस्थितीचा अंदाज घेत आहेत.

नुकतीच त्यांनी प्रभाग-९ मधील उमेदवार आनंद काणेकर यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठक घेऊन मार्गदर्शन केले व भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन केले.

भाजपला मतदान करा! : तानावडे

या बैठकीत संबोधित करतानाच तानावडे यांनी सर्व उमेदवारांशीही वैयक्तिकपणे संवाद साधला. कोणत्या उमेदवाराला प्रचारात किंवा कार्यात कोणती समस्या जाणवते याचीही माहिती करून घेतली आहे. तसेच त्या-त्या प्रभागांमधील कार्यकर्ते व मतदार यांच्याशीही त्यांनी संवाद साधत लोकांच्याही समस्या, मागण्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यासाठी भाजपला मतदान करण्याचेही आवाहन तानावडे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com