Goa History: ...त्यामुळे गोव्याचा खरा इतिहास समोर आणण्यास मदत होईल; मुख्यमंत्री सावंतांनी दिली खास विधेयकाची माहिती

गोवा राज्य विधानसभेत याबाबत माहिती देण्यात आली होती
 CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

(Goa Ancient and Historical Records Acquisition and Preservation Bill, 2023)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल (मंगळवारी) स्वातंत्र्यदिना निमित्त केलेल्या भाषणात काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले की, नुकतेच मंजूर झालेले गोवा प्राचीन आणि ऐतिहासिक अभिलेख संपादन आणि जतन विधेयक, 2023 संशोधकांना 'गोव्याचा खरा इतिहास' समोर आणण्यास मदत करेल.

 CM pramod sawant
Famous Night Club In Goa: गोव्यात नाइट आऊटचा प्लॅन करताय? तर मग जाणून घ्या फेमस 'नाईट क्लब' बद्दल...

गोवा राज्य विधानसभेत याबाबत माहिती देण्यात आली होती. कागदपत्रांचे संरक्षण करणे विभागांवर बंधनकारक असणार आहे. त्यासाठीच गोवा प्राचीन आणि ऐतिहासिक अभिलेख संपादन आणि संरक्षण विधेयक, 2023 मंजूर करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच, देशभरातून आणि जगातून आमचे सर्व ऐतिहासिक दस्तऐवज परत आणण्यासाठी कायदा करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या किंवा पीएचडी करू इच्छिणाऱ्या संशोधकांना या प्रयत्नाचा फायदा होईल. तसेच पीएचडी स्कॉलर गोव्याचा खरा इतिहास लोकांसमोर आणू शकतील. त्यामुळे मला या कायद्याचा अभिमान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com