Pickleball Tournaments
Pickleball TournamentsDainik Gomantak

Pickleball Tournaments 2023: गोव्याच्या नोएलने पटकावले रौप्यपदक

राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धा: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व

Pickleball Tournaments 2023 - गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर टेबल टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केलेला माजी राज्य विजेता अनुभवी खेळाडू नोएल नोरोन्हा याने राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेच्या इतिहासात राज्यासाठी पहिले पदक जिंकले.

त्याला 50 वर्षांवरील पुरुष एकेरीत रौप्यपदक मिळाले. अंतिम लढतीत त्याच्यावर महाराष्ट्राच्या संदीप तावडे याने मात केली. फातोर्डा येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.

या राज्याच्या स्नेहा पाटील हिने शानदार कामगिरी प्रदर्शित करताना दोन गटात विजेतेपद मिळविले. आशियाई सुवर्णपदक विजेती असलेल्या स्नेहा हिने 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत, तसेच वृषाली ठाकरे हिच्या साथीत महिला दुहेरीत बाजी मारली.

Pickleball Tournaments
Goa University: गोवा विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. लता गावडे आर्क्टिक मोहिमेवर

स्तव्य भसीन याची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने 14 वर्षांखालील मुलांत सुवर्ण, तर 19 वर्षांखालील मुलांत रौप्यपदक जिंकले.

याशिवाय अदिती सिंग, दिव्यांशू कोटारिया, संदीप तावडे यांनीही लक्षणीय खेळ केला. टेनिसमधील माजी राष्ट्रीय विजेती ईशा लखानी महिला दुहेरीत रौप्यपदकाची मानकरी ठरली.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचे अंतिम निकाल

महिला दुहेरी: सुवर्ण- वृषाली ठाकरे-स्नेहल पाटील (महाराष्ट्र), रौप्य- ईशा लखानी-ऊर्वी अभ्यंकर (महाराष्ट्र), ब्राँझ ः सौम्या लेले-अनुजा महेश्वरी (महाराष्ट्र). 14 वर्षांखालील

मुलगे एकेरी: सुवर्ण- स्तव्य भसीन (महाराष्ट्र), रौप्य- अर्जुन सिंग (महाराष्ट्र), ब्राँझ- जितेश निषाद (छत्तीसगड). १९ वर्षांखालील

मुली एकेरी: सुवर्ण- स्नेहल पाटील (महाराष्ट्र), रौप्य ः लक्षिता चितळे (महाराष्ट्र), ब्राँझ ः अदिती सिंग (महाराष्ट्र). १४ वर्षांखालील मुली एकेरी ः सुवर्ण ः अदिती सिंग (महाराष्ट्र), रौप्य ः किरण पाटील (महाराष्ट्र), ब्राँझ ः काव्या नंदरदाणे (महाराष्ट्र).

५० वर्षांवरील पुरुष एकेरी ः सुवर्ण ः संदीप तावडे (महाराष्ट्र), रौप्य ः नोएल नोरोन्हा (गोवा), ब्राँझ ः ठाकूरदास रोहिरा (महाराष्ट्र). १४ वर्षांखालील मुली दुहेरी ः सुवर्ण ः अंजली पोळ-जिनिशा क्षीरसागर (महाराष्ट्र), रौप्य ः अदिती सिंग-श्रद्धा चव्हाण (महाराष्ट्र),

ब्राँझ ः काव्या नंदरदाणे-आराध्या सातपुते (महाराष्ट्र). १९ वर्षांखालील मुलगे एकेरी ः सुवर्ण ः दिव्यांशू कोटारिया (राजस्थान), रौप्य ः स्तव्य भसीन (महाराष्ट्र), ब्राँझ ः अनुष पोपली (महाराष्ट्र).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com