Goa Police: 850 पोलिस कर्मचारी बदली होऊनही त्याच ठिकाणी! अधीक्षकांकडून कारवाईचा इशारा; 6 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश

Goa Police Transfer: मुख्यालयात अधीक्षकांनी बैठक घेऊन या पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यासाठी पोलिस स्थानक निरीक्षकांना येत्या रविवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Police
PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या पाच वर्षांपासून काढलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार सुमारे ८५० पोलिस कर्मचारी बदली होऊनही त्याच ठिकाणी असल्याची जाग पोलिस खात्याला आता आली आहे. त्यामुळे आज पोलिस मुख्यालयात अधीक्षकांनी बैठक घेऊन या पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यासाठी पोलिस स्थानक निरीक्षकांना येत्या रविवारपर्यंत (६ एप्रिल) मुदत देण्यात आली आहे.

गोव्यातील गेल्या पाच वर्षांपासून काढलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार सुमारे ८५० पोलिस कर्मचारी बदली होऊनही त्याच ठिकाणी असल्याची जाग पोलिस खात्याला आता आली आहे. त्यामुळे आज पोलिस मुख्यालयात अधीक्षकांनी बैठक घेऊन या पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यासाठी पोलिस स्थानक निरीक्षकांना येत्या रविवारपर्यंत (६ एप्रिल) मुदत देण्यात आली आहे.

Police
Goa Police: गोवा पोलिस खात्यात 1140 पदे रिक्त! 42 उपअधीक्षक, 215 उपनिरीक्षक, 442 कॉन्स्टेबल्सचा समावेश

आदेशांना वाटाण्याच्या अक्षता

अनेक पोलिस स्थानकात काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही ते अनेक वर्षे तेथेच काम करत असल्याचे आढळून आले. यावेळी अधीक्षक अल्बुकर्क यांनी जाब विचारत त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. काही पोलिस कर्मचारी दहा वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी आहेत. त्या कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. पाच वर्षे पोलिस मुख्यालयातून बदलीचे आदेश जारी होत राहिले आणि हे काही पोलिस या बदली आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत त्याच ठिकाणी ठाण मांडून राहिले होते व आपला वशिला वापरून आदेशांना बगल देत राहिले होते. याची दखल अधीक्षकांनी घेऊन त्वरित बदलीच्या ठिकाणी न गेल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Police
Goa Police: सायबर भामट्यांपासून सावध राहा, बनावट वीज बिल मेसेजना बळी पडू नका, गोवा पोलिसांचं आवाहन

कारवाईचा इशारा...

१ एकाच पोलिस स्थानकात अनेक वर्षे काम करत राहिल्याने या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे वाढतात तसेच भ्रष्टाचाराचेही प्रकार वाढतात. त्यामुळे प्रत्येक तीन वर्षांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे आवश्‍यक.

२ काही महिन्यांपूर्वी पोलिस खात्याला ज्यांना एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्याचे निर्देश दिले होते.

३ या आदेशानुसार पोलिस मुख्यालय अधीक्षक अल्बुकर्क यांनी मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश जारी केले होते.

४ मात्र, काहीजण बदलीच्या ठिकाणी पोहचलेच नाहीत. त्यामुळे काही पोलिस स्थानकांत पोलिसांची कमतरता असल्याचे दिसून आले होते.

५ बदलीच्या ठिकाणी न गेलेल्यांची संख्या मोठी असल्याने या प्रकरणाची पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com