Israel-Goa Flight: 'या' दिवसापासून सुरू होणार इस्रायल-गोवा थेट विमानसेवा

इस्रायलच्या अर्किया एअरलाईन्सची घोषणा
Israel-Goa Direct Flight
Israel-Goa Direct Flight Dainik Gomantak

Arkia Airlines Israel to start direct flight to Mopa Airport: गोव्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेस सुरवात होत आहे. मध्यपुर्वेतील इस्त्रायल या देशातून थेट गोव्यात ही विमानसेवा असणार आहे.

इस्रायलच्या अर्किया एअरलाईन्सने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या १ नोव्हेंबरपासून या विमानसेवेस सुरवात होणार आहे. इस्त्रायलची राजधानी तेल अवीव मधून थेट मोपा विमानतळावर हे विमान उतरेल.

Israel-Goa Direct Flight
Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदींकडे किती संपत्ती आहे? पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर

आत्तापर्यंत इस्रायलवरून गोव्याला थेट विमानसेवा नव्हती. त्यामुळे इस्रायलमधून येणाऱ्या प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाईट्सचाच आधार होता.

कनेक्टिंग फ्लाईटमध्ये विमानसेवेत इच्छित स्थळी पोहचण्यापुर्वी विमानाचे इतर शहरांमध्ये थांबे असू शकतात, काही वेळा विमान बदलावेदेखील लागू शकते. तर डायरेक्ट फ्लाईट विमानसेवेतून मात्र थेट दोन शहरे जोडली जात असतात.

इस्रायलमधील अर्किया या विमानसेवा कंपनीच्या या फ्लाईटमुळे थेट तेल अवीव आणि मोपा ही शहरे जोडली जाणार आहेत.

Israel-Goa Direct Flight
Goa Medical College: गोव्यात 46 रुग्णांना प्रतीक्षा अवयव दानाची; मृताच्या कुटूंबियांची संमती ठरते महत्वाची...

यापुर्वी गोव्यातून आखाती देशांमधील अबुधाबीला देखील थेट विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच आखातातील बहारीन या देशातूनही गोव्यात थेट विमानसेवा 27 मार्चपासून सुरू झाली आहे. गल्फ एअरची ही फ्लाईट बहारिन ते दाबोळी अशी आहे.

आठवड्यातून चार दिवस ही फ्लाईट असते. तर ओमान-गोवा विमानसेवेला या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात सुरवात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com