Fact Check: रतन टाटा यांच्या 'गोवा' श्वानाचा मृत्यू? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

Ratan Tata's pet dog Goa: प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्या गोवा या श्वानाचा मृत्यू झाल्याचा दावा व्हायरल मेसेजमधून केला जात आहे.
Fact Check: रतन टाटा यांच्या 'गोवा' श्वानाचा मृत्यू? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?
Ratan Tata's pet dog Goa
Published on
Updated on

Ratan Tata's pet dog Goa death viral message fact check

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. टाटांच्या मृत्यूने देशभरात शोककळा पसरली. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीला टाटांच्या लाडक्या गोवा या पाळीव श्वानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

रतन टाटा यांच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर त्यांच्या गोवा श्वानाचा देखील मृत्यू झाल्याची एक मेसेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या व्हायरल मेसेजमागील नेमकं सत्य काय?

व्हायरल होणारा मेसेज काय?

'दु:खद बातमी... रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा गोवा याचा त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर मृत्यू झाला आहे. माणसांपेक्षा कुत्रे त्यांच्या मालकाशी खूप प्रामाणिक असतात.'

असा मेसेज सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्य मेसेजची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी या मेसेजची सत्यता पडताळून व्हायरल होणाऱ्या मेसेजमागील सत्य समोर आणले आहे.

Fact Check: रतन टाटा यांच्या 'गोवा' श्वानाचा मृत्यू? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?
Kadamba Transport: कदंब बससाठी गोव्यात चालक मिळेनात? कर्नाटकात झळकली जाहीरात

मुंबई पोलिसांनी केली पडताळणी

गोवाच्या मृत्यूचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी रतन टाटांचा मित्र शंतनू नायडू याला संपर्क साधून माहिती घेतली. गोवाच्या प्रकृतीची माहिती पोलिसांनी घेतली.

'गोवाची तब्येत उत्तम आहे, काळजी नसावी. बातमी फेक आहे,' अशी माहिती शंतनू नायडूने पोलिसांना दिली.

पोलिसांना अधिकृत माहिती मिळाल्यानंतर व्हायरल होणारा हा संदेश फेक असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अशा पद्धतीची खोटी माहिती शेअर न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Fact Check: रतन टाटा यांच्या 'गोवा' श्वानाचा मृत्यू? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?
Shah Rukh Khan: अखेर भेट झालीच नाही... किंग खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, मार्गदर्शक शिक्षकाचे गोव्यात निधन

दिवंगत उद्योजक रतन टाटा यांची प्राणी प्रेमी अशीही ओळख होती. भटक्या कुत्र्यांबाबत त्यांना विशेष कणव होती. काही वर्षांपूर्वी गोव्यात असताना एक कुत्रा त्यांचा पाठलाग करु लागला. त्यांनी त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

टाटा त्या कुत्र्याला गोव्यात घेऊन आले व त्याचे गोवा असे नामकरण करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून गोवा त्यांच्यासोबत आहे. टाटांचा त्याच्यावर विशेष जीव होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला देखील गोवा अंत्यविधीच्या स्थळी आला होता.

टाटांचा कुत्र्यांवर विशेष स्नेह होता. घरातील पाळीव कुत्रा आजारी असल्याने त्यांनी २०१८ साली त्यांनी किंग चार्ल्स ३ यांनी आयोजित केलेल्या जीवनगौरव पुरस्काराला हजर राहण्यास विनम्रतापूर्वक नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com