Mopa Airport: विमानतळ बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून पगार देण्यास टाळाटाळ; 38 लाख रुपये देणे बाकी

जीपी क्यू कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पोलिसांत तक्रार
Mopa International Airport
Mopa International Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport: मोपा विमानतळाचे बांधकाम करणाऱ्या मेघा व्हाईट कंपनी कंपनीकडून जीपी क्यू कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांना पगार देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मेघा वाईट कंपनीविरोधात मोपा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जीपी क्यू काँट्रक्टर प्रा. लि. कंपनीने तक्रारीत म्हटले आहे की, कामाचे एकूण 38 लाख रुपये कामाचे देणे बाकी आहे. मेघा व्हाईट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मारहाणीची धमकीही दिली जात आहे.

Mopa International Airport
Vishwajit Rane: गोव्यात इको सेन्‍सेटिव्ह झोनला वाढता विरोध, फळदेसाईंनंतर वनमंत्री विश्वजीत राणेही मैदानात

यासंदर्भात मोपा विमानतळ पोलिस स्टेशनचे निरीक्षक महेश केरकर म्हणाले की, तक्रारीबाबत दोन्ही गटांना समोरासमोर आणून दोषींवर योग्य ती कारवाई करू.

मेघा व्हाइट कंपनीचे अधिकारी प्रभात सत्यपाठी म्हणाले की, जीपी क्यू कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. कंपनीचा युनिक इंजिनिअरिंग कंपनीबरोबर कशा पद्धतीचा करार होता, पगार दिला की नहाी, किती बाकी आहे, याबाबत कंपनीच्या लेखी कराराची कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. ही कागदपत्रे मिळाल्यानंतरच विषय सुटू शकेल.

तर जीपी क्यू कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. कंपनीचे अधिकारी गोपाळ यादव म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी सर्व कागदपत्रे दिली आहेत. परंतु बाकी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. कंपनीच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गेल्यावर हाकलून लावले जाते. कामाचे पैसे मिळत नसल्याने राज्यपालांकडेही तक्रार केली. राज्यपालांनी पोलीस उपअधीक्षक पेडणे यांना संपर्क करण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही संपर्क केला. परंतु पैसे देण्याबाबत काहीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.

Mopa International Airport
Canacona Railway Station: काणकोण येथे रेल्वेगाड्या थांबत नसल्याने स्थानिकांची अडचण

मोपा ग्रीन फिल्ड विमानतळ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून बांधकामे सुरू आहेत. जी पीक्यू कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत अग्नी विषयक सुरक्षिततेचे काम करण्यासाठी एकूण 50 कामगार युनिक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमार्फत काम करत होते. कंपनीने सहा महिन्यापूर्वी आमच्या कामगारांना अर्थात कंपनीला निलंबित केले. परंतु आम्ही कंपनीला बिले सादर करूनही आम्हाला रक्कम दिली गेलेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून आम्हाला आमचा पगार मिळवून द्यावा.

यापूर्वीही अनेक कामगारांनी पगार वेळेत मिळत नसल्याने कंपनीच्या मालमत्तेची हानी केली होती. काही ठिकाणी दोन चार वाहने जळूनही टाकली होती. गेटवर धरणे आंदोलनही केले होते. तेव्हा कंपनीने पगार दिला, त्यानंतर काही काळाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी गत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com