विमान, ट्रेनमधून प्रवास करा; IRCTC घेऊन आलंय भन्नाट गोवा टूर पॅकेज, जाणून घ्या सविस्तर

येत्या सणासुदीच्या काळात तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येण्याचा विचार करत असाल तर, IRCTC चे पॅकेज एक उत्तम पर्याय ठरेल.
IRCTC Goa Tour Package
IRCTC Goa Tour PackageDainik Gomantak

IRCTC Goa Tour Package: गोवा नेहमीच जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे, अल्हादायक निसर्ग आणि येथील संस्कृती व सण खास आहेत. वर्षभरात केव्हाही गोव्यात जाऊ शकतात मात्र, पावसाळ्यानंतर येथे पर्यटकांची मोठ वर्दळ पाहायला मिळते. तुम्हालाही गोवा फिरण्याची इच्छा असेल आणि तुम्ही ट्रीपचे प्लॅनिंग करत असाल तर, IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे.

येत्या सणासुदीच्या काळात तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येण्याचा विचार करत असाल तर, IRCTC चे पॅकेज एक उत्तम पर्याय ठरेल. चला तर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

पॅकेजचे नाव - (गोवा डिलाइट एक्स विशाखापट्टणम) GOA DELIGHT EX VISHAKHAPATNAM, पॅकेजचा कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस, प्रवासाचे साधन - फ्लाइट, कोठे जाणार- गोवा , प्रवास केव्हा करता येईल - 20 ते 24 ऑक्टोबर 2023

सुविधा कोणत्या मिळणार?

राहण्यासाठी हॉटेलची सोय, जेवणाची सोय असेल. तसेच, तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

IRCTC Goa Tour Package
गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुढल्या वर्षी पर्यटक वाहने होणार इलेक्ट्रीक

प्रवासासाठी किती शुल्क आकारले जाईल

या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 39,010 रुपये मोजावे लागतील. तर, दोन लोकांना प्रति व्यक्ती 28,750 रुपये शुल्क भरावे लागेल. तीन लोकांना प्रति व्यक्ती 27,640 रुपये शुल्क द्यावे लागेल.

मुलांसाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागतील. बेडसह 25,660 (5-11 वर्षे) आणि बेडशिवाय 25,165 रु मोजावे लागतील.

टूर पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही याचे बुकिंग करता येईल. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्हाला IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com